मोपा विमानतळावर 3.2 कोटीचा ड्रग्ज जप्त
06:22 AM Jan 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
प्रतिनिधी/ पणजी
Advertisement
मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने एक मोठ्या ड्रग्ज तस्करीचा भांडाफोड करून 3.2 कोटी ऊपये किमतीचा 9 किलोपेक्षा अधिक हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात एका विदेशी नागरिकाला अटक केली असून त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे.
बँकॉकहून ताश्कंदमार्गे आलेल्या एका प्रवाशाकडून अमलीपदार्थ जप्त करण्यात आला. त्याची तात्काळ चाचणी करण्यात आली असता, उच्च दर्जाचा गांजा असल्याचे आढळून आले आहे. मातीशिवाय घराच्या आत प्रगत शेती तंत्रांचा वापर करून लागवड केलेला हा हायड्रोपोनिक गांजा असल्याचे तपासात उघड झाले आहे. सीमा शुल्क विभागाने या प्रकरणात गुंतलेल्यांना ताब्यात घेण्यासाठी अधिक तपास सुरू केला आहे.
Advertisement
Advertisement