महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हरमल येथील कारवाईत 25 लाखाचा ड्रग्ज जप्त

10:49 AM Mar 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केरळातील दोघा संशयितांना अटक

Advertisement

पणजी : अमलीपदार्थ विरोधी विभागाने हरमल येथे केलेल्या कारवाईत 25 लाख ऊपये किमंतीचा ड्रग्ज जप्त केला आहे. या प्रकरणात दोन परप्रांतीय संशयितांना अटक केली असून त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद करुन त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयितांमध्ये मोहद बासी मेचरी (26 वर्षे) व मूरशिद मुस्ताफा कुलांगरा (24 वर्षे) यांचा समावेश आहे. दोन्ही संशयित केरळ येथील असून ते हरमल येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. हे संशयित ड्रग्ज व्यवसायात असल्याची माहिती एएनसी पोलिसांना मिळाली होती. गेला आठवडाभर पोलिस त्यांच्यावर नजर ठेवून होते. राज्यात होणाऱ्या पार्ट्यांमध्ये संशयित ड्रग्ज वितरीत करीत होते. शुक्रवारी पहाटे ड्रग्ज विक्री करण्यासाठी ते खोलीबाहेर पडणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शिताफिने कारवाई करून संशयितांना रंगेहात अटक केली. त्यांच्याकडून 25 लाख रुपयांचे सुमारे 250 एलएसडी पेपर जप्त केले आहेत. एएनसीचे निरीक्षक सजीत पिल्लई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनिल फाळकर आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article