For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हणजूण येथे 1.25 कोटीचे ड्रग्ज जप्त

01:09 PM Oct 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
हणजूण येथे 1 25 कोटीचे ड्रग्ज जप्त
Advertisement

एलएसडी रॅकेटचा पर्दाफाश : केरळच्या युवकाला अटक ,अजून काहींच्या शोधात पोलिस

Advertisement

पणजी : अमली पदार्थ विरोधी विभागाने केलेल्या कारवाईत तब्बल 1 कोटी 25 लाख ऊपये किमंतीचा ड्रग्ज जप्त केला आहे. देशभरात एलएसडी वितरीत करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून या प्रकरणात केरळातील युवकाला अटक केली आहे. त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आणखी काहीजणांना या प्रकरणात अटक करण्यात येणार असून पोलिस त्यांच्या शोधात आहेत. आत्तापर्यंत केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित केरळचा युवक गेल्या काही वर्षापासून हणजूण येथे राहत आहे.

महिनाभर पोलिसांच्या रडारवर

Advertisement

तो ड्रग्ज प्रकरणात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. एएनसी पोलिस त्याच्यावर गेला महिनाभर नजर ठेवून होते. अखेर ठोस माहिती मिळाल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा एएनसी पोलिसांनी नियेजनबद्ध कारवाई करून तो राहत असलेल्या खोलीवर छापा टाकला आणि त्याला अटक केली. त्याच्या ताब्यात असलेले 91 लाख ऊपये किमंतीचे 1 हजार 825 एलएसडी ब्लॉट पेपर्स तसेच अन्य प्रकारचे ड्रग्ज मिळून 1 कोटी 25 लाख ऊपये किंतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.

 पुस्तके, फ्रेम्समधून ड्रग्जचा पुरवठा

संशयिताची कसून उलटतपासणी केली असता संपूर्ण भारतातील त्याच्या नेटवर्कचा भंडाफोड झाला आहे. संशयित एलएसडी आणि इतर प्रकारच्या ड्रग्जचा पुरवठा करीत असे. मोठ्या प्रमाणात कुरियरद्वारे पुस्तके आणि फोटो फ्रेममध्ये ड्रग्ज लपवून कुरिअरद्वारे देशभरातील ग्राहकांना तो ड्रग्ज पाठवत असे.

मोठ्या धेंडांना पुरवित होता ड्रग्ज 

संशयित गेल्या काही वर्षांपासून गोव्यात राहत असून तो खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होता. त्याने मोठ्या प्रमाणात गोव्यात ड्रग्ज आणला आणि त्याचा तो पुरवठा करीत होता. मुख्यत: देशातील प्रमुख शहरांमधील बड्या धेंडांना तो ड्रग्जचा पुरवठा करीत होता, अशी महिती त्यानेच पोलिसांसमोर उघड केली आहे. संपूर्ण कारवाई एएनसी निरीक्षक सजीथ पिल्लई यांच्या नेतृत्वाखाली तसेच अधीक्षक टिकमसिंग वर्मा व उपअधीक्षक नेरलॉन आल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील फाळकर, हवालदार उमेश देसाई, कॉन्स्टेबल गोधीश गोलतेकर, साईराज नाईक, मकरंद घाडी आणि कुंदन पाटेकर यांनी केली आहे. उपनिरीक्षक दीनदयाळ रेडकर पुढाल तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.