For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओशेलात 25 लाखांचा ड्रग्ज जप्त, महिलेस अटक

02:59 PM Mar 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
ओशेलात 25 लाखांचा ड्रग्ज जप्त  महिलेस अटक
Advertisement

म्हापसा : ओशेल पंचायतक्षेत्रातील आराडी (सार्वजनिक स्मशानभूमिनजीक) हणजूण पोलिसांनी गुऊवारी रात्री केलेल्या कारवाईत 25 लाख 15 हजारांचा अमलीपदार्थ जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत फ्रान्स देशाचा नागरिक असलेल्या संशयित गॅली लुईश डॅनियल पॉवलीनो (43 वर्षे) या महिलेस पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार तिला पोलिस कोठडी फर्मावण्यात आली आहे. हणजूण पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ओशेलातील ट्रॉपिकांना ड्रीम्स अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असलेल्या पॉवलीनो यांच्यावर अनेक दिवसांपासून पाळत ठेवून असलेल्या हणजूण पोलिस पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. हणजूण पोलिसस्थानकाच्या महिला उपनिरीक्षक लिशा गाऊडी, निरीक्षक सुरज गांवस, म्हापशाचे उपअधीक्षक लिल्सन डिसोझा तसेच उत्तर गोवा अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबतीत पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.