For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सलग दुसऱ्या दिवशी गुजरातमध्ये ड्रग्ज जप्त

06:25 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
सलग दुसऱ्या दिवशी गुजरातमध्ये ड्रग्ज जप्त
Advertisement

1,200 कोटींच्या अमली पदार्थांसह दोन पाकिस्तानींना अटक

Advertisement

वृत्तसंस्था/ पोरबंदर

भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी अरबी समुद्राच्या भारतीय हद्दीत 1,200 कोटी ऊपयांचे 163 किलो हेरॉईन जप्त केले. या पथकाने ड्रग्जची तस्करी करणाऱ्या दोन पाकिस्तानी नागरिकांनाही अटक केली आहे. माशांच्या साठ्यामागे अमली पदार्थांची पाकिटे लपवून ठेवण्यात आल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. कारवाईदरम्यान सुरक्षा यंत्रणेच्या बोटीचे नुकसान करून ड्रग्जची पाकिटे समुद्रात फेकण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

Advertisement

भारतीय तटरक्षक दल, गुजरात दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) यांनी गुप्तचर माहितीच्या आधारे पोरबंदरजवळ अरबी समुद्रात संयुक्त कारवाई केली. एक संशयास्पद बोट दिसल्यावर तिची नाकाबंदी करण्यात आली. यावेळी बोटीवरील कर्मचाऱ्यांनी भारतीय सुरक्षा एजन्सीच्या बोटीचे नुकसान करण्याचा प्रयत्न केल्यामुळे सुरक्षा दलांनी गोळीबार केला. एजन्सींची कारवाई पाहता क्रूने ड्रग्जची 3 पाकिटे समुद्रात फेकून दिली. हा अमली पदार्थ साठा तामिळनाडूमार्गे श्रीलंकेत पाठवला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तत्पूर्वी रविवारी भारतीय तटरक्षक दलाने एटीएस आणि एनसीबी यांच्या सहकार्याने 600 कोटी ऊपयांचे 86 किलो अमली पदार्थ जप्त केले. या कारवाईत पाकिस्तानी जहाजातील 14 क्रू सदस्यांना अटक करण्यात आली होती. या दोन्ही कारवायांमधील पुढील तपास आणि कायदेशीर कार्यवाहीसाठी चालक दल आणि जहाज सध्या पोरबंदर येथे आणण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.