कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur Round Table: कोल्हापूराचा उडता पंजाब करायचा नाय!

03:08 PM Jul 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अंमली पदार्थ सेवनाच्या विरोधात शासनाने कठोर पावले उचलली आहेत

Advertisement

कोल्हापूर :तरुण भारत संवाद’तर्फे कोल्हापूर शहर कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवारी राऊंड टेबल चर्चासत्र झाले. गांजा आणि अंमली पदार्थांचे सेवन या गंभीर सामाजिक समस्येवर सखोल मंथन झाले. अंमली पदार्थ सेवनाच्या विरोधात शासनाने कठोर पावले उचलली आहेत. 112 क्रमांकावर कॉल केल्यास अशा समाजविघातक प्रवृत्तींना रोखण्यासाठी अवघ्या तीन मिनिटांत पोलीस पोहोचतात. अमली पदार्थ विशेषत: गांजाचे रॅकेट हे कर्नाटकशी संलग्न असून विक्री आणि पुरवठा व्यवस्था रोखण्यावर पोलिसांचा भर आहे.

Advertisement

कोल्हापूरला ’उडता पंजाब’ होऊ द्यायचे नाही, त्यासाठी विविध सामाजिक संघटना, पोलीस प्रशासन आणि सर्वसामान्य कोल्हापूरकरांनी एकत्र येण्याची गरज अधोरेखित झाली आहे. या चर्चासत्रात शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके, सेवा रुग्णालयाचे डॉ. आदित्य सावंत, सामाजिक कार्यकर्त्या दीपा शिपूरकर, कोल्हापूर पानपट्टी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण सावंत, जिम प्रशिक्षक राजू कवाळे आणि व्यायामपटू कौशिक कदम यांनी सहभाग घेतला.

शरीरावरील दुष्परिणाम

गांजाच्या सेवनामुळे मेंदूच्या विशिष्ट भागांवर कार्य केले जाते. सेवन केले किंवा धूम्रपान केले तरी, ते मेंदूला डोपामाईन सोडण्यास कारणीभूत ठरते, याच्या सेवनाने आनंद किंवा विश्रांतीची भावना निर्माण होते. यामुळे मूड बदलणे, नैराश्य येणे, मनात आत्महत्येचे विचार, स्मरणशक्ती कमी होते असे परिणाम होतात. गांजाच्या सेवनाने काही तत्काळ वापरणे थांबवले की, परिस्थिती उलट होते आणि हे न्यूरोट्रांसमीटर कमी होतात.

गणशोत्सवानंतर प्रबोधन

पोलीस प्रशासनाने कारवाईसोबत शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्याचे नियोजन केले आहे. परिणामही शरीरात होतात. जसे की, रक्ताळलेले डोळे, हृदयाची गती वाढणे, रक्तदाब वाढणे, चिंता, स्मृती कमजोरी, मूडमध्ये अचानक बदल, बदलाची जाणीव होणे, दैनदिन कामात अडचण, भ्रम होणे आदी बदल होतात.

दीर्घकालीन परिणाम

गांजा ओढल्याने फुफ्फुसांच्या आरोग्यावर लक्षणीय परिणाम होतो, फुफ्फुसांच्या आजाराचा धोका वाढतो, अंतर्गत पेशींच्यावर परिणाम होऊन दीर्घकालीन खोकला, कफ वाढणे असे आजार होऊ शकतात. गांजाच्या दीर्घकाळ सेवनाचा मेंदूच्या विकासावर देखील परिणाम होतो. विशेषता विकसित होत असलेल्या मेंदूंवर परिणाम होतो, अल्पवयीन मुले गांजाच्या लवकर संपर्कात आली तर दीर्घकालीन मानसिक आजाराचा धोका असतो.

फेंटानिल

फेंटानिल हे एक अत्यंत शक्तीशाली ड्रग आहे. जे प्रामुख्याने वेदनाशामक म्हणून वापरले जाते. हेरॉईनपेक्षा 30 ते 50 पट अधिक आणि मॉ र्फिनपेक्षा 50 ते 100 पट अधिक शक्तिशाली आहे.

मॉर्फिन

पूर्वी मॉर्फियम म्हणून ही ओळखले जात होते. नैसर्गिकरित्या आढळणारे एक अफू आहे. एक गडद तपकिरी चुरा जे खसखसच्या बोंडाला वाळवून तयार केले जाते. हे प्रामुख्याने वेदनाशामक म्हणून वापरले जाते.

मेफेड्रोन

तरुण मुले हे मेफेड्रोनचा सर्वात जास्त वापर करतात. हे घेतल्यानंतर शरीरावर त्वरित काम करते आणि त्याचा परिणाम ते घेतल्यानंतर 15 ते 45 मिनिटांच्या दरम्यान होतो. हे सहसा तोंडाने घेतले जाते. याच्या वापरामुळे मध्यवर्ती मज्जा संस्थेतील सेरोटोनिन आणि डोपामाइन या न्यूरोट्रांसमीटरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. एकदा व्यक्तीने औषध

शहरातील ब्लॅकस्पॉट

पोलीस प्रशासनाने केवळ गांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई न करता गांजा सेवन करणाऱ्यांवरही कारवाई केली आहे. यातून काही गांजा विक्रेत्यांपर्यंतही पोहोचण्यात यश आले आहे. याचसोबत गांजा ओढणाऱ्यांचे ब्लॅकस्पॉट पोलीस प्रशासनाने शोधून काढले असून, त्यावर सतत कारवाई सुरु आहे. गांधी मैदान, शिवाजी स्टेडियम, हॉकी स्टेडियम परिसर, पाण्याचा खजिना, पॅव्हेलियन मैदान, सासने ग्राउंड असे ब्लॅकस्पॉट शोधले आहेत.

तीन टप्प्यात कारवाई

पोलीस प्रशासनाने अंमली पदार्थांच्या विरोधात झिरो ड्रग्ज मोहिम हाती घेतली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात येणाऱ्या अंमली पदार्थांची माहिती गोळा करणे, दुसऱ्या टप्प्यात पुरवठादारांचा शोध घेवून कारवाई करणे आणि तिसऱ्या टप्प्यात नशा करणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्याचे नियोजन केले आहे.

ड्रग्सचे व्यसन का लागतं?

मानवी मेंदूमध्ये लाखो नसांचे जाळे असते. यामधूनच संदेशाचे वहन होत असते. यातील एक नेटवर्क असे असते जे आपल्याला आपण काही कृती केल्यानंतर चांगले वाटणारी भावना निर्माण करते. हे नेटवर्क कार्यान्वित होते तेव्हा चेतापेशीमधून डोपामिन स्त्रवते आणि आपल्यामध्ये चांगलं वाटणारी भावना निर्माण होते. ही चांगलं वाटण्याची भावना जागं करणाऱ्या शरीरातील नेटवर्क्सचा ताबा ड्रग्स घेतात.

प्रचंड मोठ्या प्रमाणात डोपमिन स्त्रवतं. आणि मेंदूमध्ये ही चांगलं वाटायला लावणारी रसायनं साठतात. हे सगळे पुन्हा अनुभवण्यासाठी पुन्हा पुन्हा या मादक पदार्थांच्या सेवनाची इच्छा निर्माण होते. या सेवनाचे किंवा सेवन केलेले असतानाच्या काळातल्या कृतींमुळे वाईट परिणाम झाले तरी हे सेवन पुन्हा पुन्हा केले जाते. यालाच व्यसन असे म्हणतात.

सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी पोलीस कायमच धावून येतात. अडचणीच्या काळात नागरिकांना अधिक वेगवान मदत मिळावी. यासाठी पोलीस दलाकडून मदतीसाठीचा डायल 112 हेल्पलाइन सुरु केली आहे. अडचणीच्या काळात नागरिकांनी 112 नंबर डायल केल्यानंतर संबंधीत नागरिकाला 3 मिनिटांमध्ये पोलिसांची मदत मिळते.

तक्रारदार नागरिकाने 112 नंबर डायल केल्यास प्रथम हा कॉ ल नवी मुंबईतील केंद्राला जातो. तेथे संबंधीत नागरिकांकडून तक्रारीसंदर्भात संपूर्ण माहिती घेतली जाते. ती माहिती संबंधित जिह्याला पाठविली जाते. तक्रार पाहून त्याची माहिती तेथून जवळ असलेल्या पोलीस मार्शलला पाठविली जाते. मार्शल कॉल्सची पूर्तता करुन त्याची माहिती पोलीस ठाण्याला दिली जाते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पार पडते आहे. त्यामुळे तक्रारदार नागरिकांना तत्काळ मदत मिळत आहे.

जर एखाद्या नागरिकाने खोडसाळपणे अफवा पसरण्यासाठी 112 हेल्पलाईनवर कॉल केला तर कॉल करणाऱ्या तक्रारदार नागरिकाचे या हेल्पलाइनवर लोकेशन समजते. त्यामुळे असे फेक कॉ ल करणाऱ्या संबंधित तक्रारदार नागरिकांच्याविरोधी कारवाई देखील केली जाते आहे.

त्यामुळे 112 हेल्पलाइनवर फेक कॉल कऊ नका, असे आवाहन पोलीस उपाअधीक्षक अजित टिके यांनी केले. त्याचबरोबर समाजामध्ये अनुचित घटना घडत असेल तर त्याबाबत एकाद्या नागरिकांने सजगता दाखवून 112 हेल्पलाइनला कॉल कऊन माहिती दिली. तर त्या संबंधित नागरिकांचे नाव पत्ता उघड न करता त्यांचे नाव व पत्ता गोपनीय ठेवण्यात येते असल्याचे सांगितले.

गुन्हेगारी स्वरूपाच्या व्यावसायिकांमुळे आमचा व्यवसाय बदनाम

आमच्या संघटनेतील सर्वच पानपट्टीधारक वाईट नाहीत. त्यातील 80 टक्के प्रामाणिकपणे व्यवसाय करतात. पण, उरलेल्या 10 ते 15 टक्के व्यावसायिकांमुळे आमच्या व्यवसायाला गालबोट लागत आहे. 2014 साली केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबत बैठक झाली होती.

त्यामध्ये आम्ही त्यांनी तंबाखूबंदीचा 10 वर्षाचा कृती कार्यक्रम आखण्यास विनंती केली होती. ऑगस्टमध्ये आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेणार आहोत. आणि काही गुन्हेगारी स्वरूपाच्या व्यावसायिकांमुळे आमचा पाणीपट्टी व्यवसाय बदनाम होत आहे. गांजा ओढण्यासाठी वापरला जाणारा रिझला पेपर जीएसटी भरून विक्रीसाठी येतात.

गुन्हेगार लोक गांजा विक्री व्यवसायात उतरलेत

"गंभीर स्वरूपाचे गुन्हे असणारे लोक बेकायदा अंमली पदार्थ, गांजा विक्री व्यवसायात उतरलेत. त्यामुळे या व्यवसायाचे गुन्हेगारीकरण झाले आहे. कोल्हापुरातील काही महाविद्यालयातील तरूणी देखील अंमली पदार्थाच्या शिकार झाल्यात. ही अतिशय गंभीर बाब म्हणावी लागेल. पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन असे पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. आमच्या संघटनेने वेळोवेळी एफडीआयला सहकार्य केले आहे. आम्ही पोलिसांनाही भविष्यात सहकार्य करू. सर्वजण मिळून या समस्या रोखूया. या व्यवसायात असणाऱ्या व्हाईट कॉलर गुडांना देखील कायद्याचा चाप बसला पाहिजे अशी आमची ठाम मागणी आहे."

- अरूण सावंत, अध्यक्ष पानपट्टी असोसिएशन, कोल्हापूर.

ड्रग्स घेण्यामुळे हृदयविकार वाढलाय

"जिममध्ये जाणाऱ्या तरुणांमध्ये बॉडी बनवण्यासाठी ड्रग्सचा वापर करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. टर्मिन नावाचे ड्रग्स जिममध्ये प्रसिद्ध झाले आहे. याचे सेवन केल्यावर संबंधित तरुण एक तासाऐवजी सतत चार तास वर्कआउट करू शकतो. मेडिकलमध्ये हे टर्मिन ड्रग्स सहज उपलब्ध होत आहे. पण, याचा शरीरावर प्रचंड दुष्परिणाम होत आहे. सध्याचे तरुण बॉडी बनवण्यासाठी नैसर्गिक खुराक घेण्याऐवजी टर्मिन ड्रग्सचा वापर करत आहेत. तसेच गांजाचे प्रमाण प्रचंड वाढलेय. बॉ डी बिल्डिंगसाठी गांजा सुद्धा सेवन केला जात आहे. हे कुठेतरी थांबण्याची गरज आहे."

- राजू कवाळे, जिम ट्रेनर

थुंकीमुक्त कोल्हापूरसाठी कडक कारवाईची गरज

"कोरोना कालावधीमध्ये सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थुंकणाऱ्याला अडवून जाब विचारला. पोलिसांकडे तक्रार केली, त्याच्यावर कारवाईही केली. तेथूनच खरी थुंकीमुक्त कोल्हापूर चळवळीला सुरूवात झाली. गुटखा, मावा, तंबाखू खाऊन कोठेही थुंकतात, त्यातून संसर्गजन्य आजार वेगाने पसरतात. एका नगरसेवकाने कार्यकर्त्यांसाठी स्पर्धा घेतली होती. यात जिंकणाऱ्यांना बक्षीस म्हणून मावा दिला, ही गोष्ट अतिशय गंभीर आहे. तसेच गुटखा खाऊ नकोस असे सांगणाऱ्या प्राध्यापकालाच तरूणांनी मारहाण केली. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी नशा करणाऱ्या आणि थुंकणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे."

- दीपा शिपूरकर, संस्थापक, थुंकीमुक्त कोल्हापूर चळवळ.

ड्रग्स सेवनाचे प्रमाण वाढले

"एखाद्या पदार्थाचे सेवन केल्यानंतर गुंगी येत असेल, सुस्ती येत असेल, भास होत असतील तर त्याला ड्रग्स म्हणतात. त्याचे जर का जास्त प्रमाणात सेवन करायला लागले तर त्याला व्यसन म्हणतात. त्यात सिगरेट, अल्कोहोल आलेच त्याच बरोबर गांजा, मावा, हेरॉईन, कोकेन, मॅर्फिन, फेंटानिलचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. जे पूर्वी रासायनिक खत म्हणून शेतात वापरले जायचे ते मेफेड्रोन आता सहज उपलब्ध होत आहे. सध्या गांजाचे सेवन हे कोणत्याही प्रकारे करता येते. त्याचा धूर करुन तो नाकावाटे घेतला जातो. त्याची गोळी करुन जिभेखाली देखील ठेवली जाते. खाण्याच्या पदार्थामध्ये देखील मिक्स करुन खाल्ला जातो. अशा पद्धतीत गांजाचे सेवन केले जाते. ड्रग्स सेवनाचे प्रमाण तरुणाईत वाढले आहे. पालकांनी मुलांना विश्वासात घेऊन चौकशी केली पाहिजे."

- डॉ. आदित्य सावंत, वैद्यकीय अधिकारी, सेवा रूग्णलय, कसबा. बावडा.

ड्रग्सचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक

"तरुणांमध्ये जिमची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढलीय. कमी वेळात आकर्षक शरीर बनवण्यासाठी अनेक तरुण बाजारात सहज मिळणाऱ्या टर्मिन ड्रग्सचा वापर करतात. या ड्रग्समुळे व्यायाम करण्याची क्षमता काही प्रमाणात वाढते. पण, याचे गंभीर दुष्परिणाम होतात. नैसर्गिक ताकद वाढवण्याऐवजी तरुण शॉर्टकटचा मार्ग निवडत आहेत. त्यामुळे शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होत आहेत. बावडा येथील गोळीबार मैदान, यल्लमा मंदिर परिसर, राजाराम बंधारा परिसरात संध्याकाळच्या वेळी अनेक तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी आम्ही जाऊन गस्त घालून या तरुणांना मैदानातून हाकलून लावत आहोत. मात्र, ही समस्या थांबत नसल्याने पोलीस प्रशासनाने आणि पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे."

- कौशिक कदम, व्यायामपटू.

तस्करीवर नियंत्रण मिळवण्यात काही प्रमाणात यश

"कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात अंमली पदार्थाच्या सेवनाची समस्या भेडसावत आहे. शासन आणि प्रशासन याबाबत गांभिर्याने काम करत आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आणि पोलीस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी अंमली पदार्थाविरोधात कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अंमली पदार्थांविरोधात कारवाई सुरु केल्यामुळे अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण मिळवण्यात काही प्रमाणात यश आले आहे. कोल्हापुरात येणारा गांजा हा परराज्यातून येतो. तेथील साखळी उघडकीस आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंमली पदार्थविरोधात टास्क फोर्सची नियुक्ती केल्यामुळे आता आणखी प्रभावीपणे कारवाई होतील."

- अजित टिके, शहर पोलीस उपअधिक्षक.

थुंकी मुक्त अभियानाला कोल्हापुरातून सुरूवात

कोणत्याही नवीन उपक्रमाची सुरूवात कोल्हापुरातूनच होते. थुंकल्याने अनेक आजारांचा संसर्ग होण्याचा धोका असतो. याचे गांभिर्य लक्षात घेऊन थुंकीमुक्त चळवळीला राज्यात सर्व प्रथम कोल्हापुरातून सुरूवात झाली. याला खऱ्या अर्थाने कोरोनापासून प्रारंभ करण्यात आला. ही चळवळ बळकट करण्यासाठी सर्वांनी या अभियानात सहभागी होण्याची गरज आहे.

गुटखा विक्रीच्या मुळापर्यंत जाण्याची गरज

गुटखा विक्रीला बंदी असली तरी कोणत्याही पानटपऱ्यांवर गुटखा सहजपणे उपलब्ध होतो. गुटखा खाणाऱ्यापासून विक्री करणारा किरकोळ पानटपरीवरील कारवाईसह गुटखा तस्करी रॅकेटच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे. तरच गुटखा विक्रीला आळा बसण्यास हातभार लागेल.

Advertisement
Tags :
@kolhapur@KOLHAPUR_NEWS#drugs#Police action#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaKolhapur Round Tableudata panjab
Next Article