For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माशांवरही होतोय ड्रग्जचा परिणाम

06:28 AM May 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
माशांवरही होतोय ड्रग्जचा परिणाम
Advertisement

जगभरातील नद्या आणि सरोवरांमध्ये अमली पदार्थांमधून शिल्ल्क राहिलेले रसायने अद्याप आहेत, कोकेन आणि त्याचे रसायन पाण्यात मिसळत आहे, ज्याप्रमाणे घरात धूरात श्वास घेणाऱ्या मुलांना नुकसान पोहोचते, तसेच प्रदूषित पाण्यात राहणारे छोटे छोटे जीव, मासे आणि शाकं देखील रसायनांना शरीरात शोषून घेत आहेत.

Advertisement

पहिल्यांदाच वैज्ञानिकांनी जंगलातील जलस्रोतांमध्ये असलेल्या माशांच्या वर्तनाचे अध्ययन केले आहे. स्वीडनच्या टीमने अटलांटिक सॅल्मन माशांवर प्रयोग केला. याचा निष्कर्ष चकित करणारा हाहेता.  कोकेनयुक्त पाण्यात राहणारे मासे अधिक दूर दूरपर्यंत भटकू लागले. हे अध्ययन करंट बायोलॉजी नियतकालिकात प्रकाशित झाले आहे.

पाण्यात कोकेन कसे पोहोचतेय?

Advertisement

नशेचा प्रभाव माणसांवर काही तासांमध्ये निघून जातो, परंतु कोकेन आणि त्याचे रसायन (बेंजॉयलेकोगोनिन) दीर्घकाळापर्यंत पाण्यात राहते. जगभरातील नद्या आणि सरोवरे यांनी भरलेले आहेत. लॅबच्या प्रयोगांमध्ये कोकेन मिळाल्यावर पाण्यात छोटे किडे वेगाने पोहू लागतात असे दिसून आले. क्रेफिश स्वत:ची सुरक्षित लपण्याची जागा सोडून धोकादायक ठिकाणांवर पोहोचतात. परंतु आतापर्यंत जंगली माशांच्या वर्तनाचे अध्ययन झाले नव्हते. स्वीडनचे वैज्ञानिक जॅक ब्रँड आणि मायकल बर्ट्रम यांच्या टीमने हे काम केले आहे. वैज्ञानिकांनी हॅचरीतून मिळविण्यात आलेल्या दोन वर्षे वयाच्या सॅल्मन माशांना निवडले. त्यांनी त्यांच्या शरीरात छोट्या छोट्या शस्त्रक्रिया करत उपकरणे बसविली. ही उपकरणे हळूहळू कोकेन किंवा त्यातील शिल्लक रसायनांना शरीरात सोडत होती. हे प्रदूषित पाण्यात राहणाऱ्या माशाइतकेच असावे इतकेच प्रमाण ठेवण्यात आले होते.

एकूण 105 माशांना तीन समुहात विभागण्यात आले. एका समुहाला कोकेन, दुसऱ्याला बेंजॉइलेकोगोनिन आणि तिसऱ्याला कुठल्याही रसायनाशिवाय नियंत्रित समुहात विभागले गेले. सर्व माशांवर छोटे ट्रॅकिंग टॅग लावण्यात आले. मग त्यांना स्वीडनच्या वेटर्न सरोवरात सोडण्यात आले आणि दोन महिन्यांपर्यंत त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली.

निष्कर्ष पाहून चकित

सामान्य सॅल्मन मासे सोडण्यात आल्यावर पूर्वीपेक्षा अधिक फिरत असल्याचे आणि मग हळूहळू एका ठिकाणी थांबतात. परंतु यावेळी कोकेन आणि त्याच्या शिल्ल्क रसायनाने युक्त मासे दीर्घकाळापर्यंत भटकत राहिले. बेंजॉइलेकोगोनिनयुक्त मासे दर आठवड्याला नियंत्रित माशांपेक्षा 1.9 पट अधिक अंतर कापत होते. दोन महिन्यांनी नियंत्रित मासे सरोवराच्या दक्षिण काठापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर वसले, कोकेनयुक्त आणखी काही अंतरावर गेले, तर बेंजॉइलेकोगोनिन युक्त सुमारे 32 किलोमीटर अंतरावर पोहोचले. कोकेनचा मुख्य तुटलेले रसायन अधिक काळापर्यंत माशांच्या शरीरात राहते याचमुळे त्याचा प्रभावही अधिक होता असे वैज्ञानिकांना आढळून आले. हा बल माशांच्या जीवनाला किती नुकसान पोहोचवेल हे अद्याप स्पष्ट नाही. अधिक भटकल्यामुळे त्या शिकार शोधण्यास चांगल्या ठरण्याची शक्यता आहे किंवा स्वत: शिकाऱ्यांची शिकार ठरू शकतात. याप्रकरणी आणखी अध्ययन करण्याची आवश्यकता असल्याचे वैज्ञानिक सांगतात. खुल्या नदीतील माशांवरही हाच प्रभाव पडणार का असा प्रश्न उपस्थित होतो. कारण हॅचरीचे मासे स्वाभाविक स्वरुपात कमी खबरदारी बाळगातत. परंतु अमली पदार्थांचे अवशेष आणि दूसरे प्रदूषक आता पाण्यातील जीवनासाठी मोठा धोका ठरल्याचे निश्चित आहे.

Advertisement
Tags :

.