For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

अमली पदार्थ तस्कर अमृतपालला अटक

06:37 AM Dec 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
अमली पदार्थ तस्कर अमृतपालला अटक

700 कोटींच्या हेरॉईन प्रकरणात एनआयएची कारवाई

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

एनआयएने अटारी सीमेवरील हेरॉईन जप्ती प्रकरणातील प्रमुख फरार आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती शनिवारी तपास यंत्रणांच्या हवाल्याने जारी करण्यात आली. अमृतपाल सिंग असे आरोपीचे नाव असून तो पंजाबमधील तरनतारन जिह्यातील रहिवासी आहे. आरोपी दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी अटक झालेला अमृतपाल सिंग हा तिसरा आरोपी आहे.

Advertisement

एप्रिल 2022 मध्ये भारत-पाकिस्तान सीमेवरून अफगाणिस्तानमधून 102 किलोपेक्षा जास्त अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित प्रकरणात अटकेची कारवाई केल्याचे सांगण्यात आले. अमृतपाल हा पॅश हॅन्डलर होता. बँकिंग आणि हवाला चॅनेलद्वारे अमली पदार्थांच्या रकमेचे सर्व व्यवहार तो सांभाळत असल्याचे एनआयएने सांगितले. हे प्रकरण एकूण 102.784 किलो हेरॉईनच्या जप्तीशी संबंधित असून त्याची किंमत अंदाजे 700 कोटी ऊपये आहे. 24 आणि 26 एप्रिल 2022 रोजी भारतीय कस्टम विभागाने केलेल्या दोन कारवायांमध्ये मोठा साठा जप्त करण्यात आला होता.

Advertisement

अमृतपालला 12 डिसेंबर रोजी अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुबईला पळून जाण्याचा प्रयत्न करताना इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. एनआयएने आरोपींविऊद्ध जारी केलेल्या लुक आऊट परिपत्रकाच्या संदर्भात 7 डिसेंबर रोजी सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या आदेशाच्या आधारे अधिकाऱ्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणातील विविध आरोपींच्या साथीदारांची चौकशी केल्यानंतर अमृतपालची आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांशी संबंधित कटातील भूमिका समोर आली. याशिवाय त्याच्या बँक खात्यांमध्ये झालेल्या अनेक आक्षेपार्ह व्यवहारांमधूनही या प्रकरणाचा पर्दाफाश झाला होता.

Advertisement
×

.