Sangali Crime News | बलगवडे येथे ड्रग्जचा साठा जप्त
03:13 PM May 22, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
नशेच्या इंजेक्शनचा साठा पोलिसांनी जप्त केला
तासगाव : तासगाव तालुक्यातील बलगवडे येथे नशेच्या इंजेक्शनचा मोठा साठा तासगाव पोलिसांनी जप्त केला असून या कारवाईत ८५ नशेची इंजेक्शने ताब्यात घेण्यात आली आहेत. जप्त करण्यात आलेल्या इंजेक्शनची किंमत सुमारे ३७ हजार १७.५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Advertisement
याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून बुधवारी रात्री ही कारवाई पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
नागेश अरविंद औताडे (वय २१, रा. बलगवडे वस्ती, ता. तासगाव) आणि समीर अमजद मुलाणी (वय २४, रा. स्टँडजवळ, बलगवडे) अशी अटक करण्यात आलेल्या संशायितांची नावे आहेत. याबाबत तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ड्रग्ज रॅकेटचे समूळ उच्चाटन करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार तालुक्यातील अवैध ड्रग्ज साठ्यावर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती.
या पथकातील पोलीस कर्मचारी प्रशांत चव्हाण यांना बलगवडे-मांझर्डे रोडलगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये नशेच्या इंजेक्शनचा साठा करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी रात्री सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला.
यावेळी शेडमध्ये ८५ नशेची इंजेक्शने आढळून आली. पोलिसांनी साठा जप्त करून दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक संजीव झाडे, विशाल टकले, बिरुदेव काबुगडे, अभिजीत गायकवाड, विनोद पाटील, सचिन जोंजाळ, यांच्या पथकाने केली.
Advertisement
पो. ना. प्रशांत चव्हाण यांची उल्लेखनीय कामगिरी
या कारवाईत तासगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी प्रशांत चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी मिळालेली गोपनीय माहिती तातडीने पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत ड्रग्जचा साठा उघडकीस आणला.