For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजस्थान सीमेवर ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश

06:45 AM Jul 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
राजस्थान सीमेवर ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश
Advertisement

तब्बल 300 कोटींचे 60 किलो हेरॉइन जप्त, 9 जणांना अटक : पंजाब पोलिसांची संयुक्त कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था/ इंफाळ

पंजाब पोलिसांनी ड्रग्ज तस्करांवर कारवाई करत एका मोठ्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. पंजाब पोलिसांनी सोमवारी राजस्थानमधील बारमेर येथील आंतरराष्ट्रीय सीमेजवळून मोठ्या प्रमाणात हेरॉइन जप्त केले. पंजाब पोलिसांनी सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि राजस्थान पोलिसांसोबत संयुक्त मोहिमेंतर्गत ही कारवाई केली. या मोहिमेत एका ड्रग्ज टोळीचा पर्दाफाश करत 60 किलोपेक्षा जास्त हेरॉइन जप्त केले. हे अमली पदार्थ जवळपास 300 कोटी रुपयांचे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या कारवाईनंतर पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि जम्मू  काश्मीरमधून एकूण 9 जणांना अटक करण्यात आल्याचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी स्पष्ट केले.

Advertisement

आंतरराष्ट्रीय कनेक्शन

डीजीपी गौरव यादव यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कारवाईसंबंधी माहिती दिली आहे. ‘एका मोठ्या कारवाईत, अमृतसर आयुक्तालय पोलिसांनी बीएसएफ आणि राजस्थान पोलिसांच्या सहकार्याने राजस्थानमधील बाडमेर येथील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानी तस्कर तनवीर शाह आणि त्याचा कॅनडास्थित बॉस जोबन कालेर यांनी चालवलेल्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी टोळीचा पर्दाफाश केला’, असे त्यांनी म्हटले आहे. या कारवाईत 60.302 किलो हेरॉइनचा मोठा साठा जप्त केल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्य तस्कराला अटक केल्यानंतर पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि जम्मू काश्मीरमधून नऊ प्रमुख सदस्य आणि हवाला ऑपरेटरना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी डीजीपी गौरव यादव यांच्या नेतृत्त्वाखाली सुरू आहे.

Advertisement
Tags :

.