For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Miraj News | मिरजमध्ये नशेखोराचा धुमाकूळ; कोयत्याने कापड दुकानाची तोडफोड

04:01 PM Mar 05, 2026 IST | NEETA POTDAR
miraj news   मिरजमध्ये नशेखोराचा धुमाकूळ  कोयत्याने कापड दुकानाची तोडफोड
Advertisement

                         मिरजमध्ये भरसायंकाळी तोडफोड

Advertisement

मिरज -शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील चौक येथे एका अनोळखी नशेखोराने कोयता घेऊन दहशत माजवत कापड दुकानाची तोडफोड केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याबाबत कापड दुकान मालक मनोज चव्हाण यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे. तोडफोडीनंतर संशयीत नशेखोर पळून गेला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

भाऊराव पाटील चौकात मनोज चव्हाण यांचे मनोज कलेक्शन नावाने रेडीमेड कपड्यांचे दुकान आहे. बुधवारी सायंकाळी मनोज हे दुकानातगिऱ्हाईक करीत असताना अनोळखी नशेखोर हातात कोयता घेऊन आला. दुकानासमोर असलेले कपड्यांचे स्टैंड पाडून तोडफोड केली. तसेच दुकानाच्या काचेवर कोयता मारुनमिरज कर्मवीर भाऊराव पाटील चौकातील याच कापड दुकानात नशेखोराने धुमाकूळ घालून तोडफोड केली, काचही फोडली. दुकान मालकाला दुकान बंद करायचे, अशी धमकी देत दहशत निर्माण केली. त्यानंतर संबंधीत नशेखोर दुचाकीवरुन पळून गेला.

Advertisement

सदरचा सर्व प्रकार सीसीटीव्हीतकैद झाला. या प्रकारानंतर मनोज चव्हाण यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली. सीसीटीव्हीत संशयीत नशेखोराचा चेहरा स्पष्टपणे दिसत असून, त्याआधारे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, भाऊराव पाटील चौक आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून नशेखोरांकडून दहशत माजविण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या परिसरात टोळीने फिरणाऱ्या सराईत गुन्हेगार व नशेखोरांची दहशत वाढली असून, पोलिसांनी दहशत मोडून काढावी, अशी मागणी येथील व्यापाऱ्यांकडून होत आहे.

Advertisement
Tags :

.