Miraj Crime | मिरजेत नशेखोरांचा हैदोस! ST चालक-वाहकावर हल्ल्यानंतर सिव्हीलमध्येही धिंगाणा
मिरज - शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर कोल्हापूर ते जालना एसटी थांबवून चालक, वाहक व पोलिसावर खुनी हला केल्यानंतर नशेखोर अब्दुल्ला पटेल व त्याचा भाऊ सैफुल्ला पटेल या दोघांनी मिरज शासकीय रुग्णालयातही धिंगाणा घातला. अटक होण्यापूर्वी उपचार करुन घेण्यास टाळाटाळ करुन जोरजोरात आरडाओरड करत पोलिसांना शिवीगाळ केली. तसेच मिरज सिव्हीलच्या बाह्य रुग्ण विभागातील काही फरशा फोडल्या. मुख्य दरवाजावरही लाथा मारुन दरवाजा तोडला. रात्री दीड वाजेपर्यंत नशेखोरांचा हा तमाशा सुरू होता. दरम्यान, या हल्ल्यातील जखमी पोलिस व एसटी कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
]
मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरहून जालन्याकडे जाणारी एसटी मिरज पंचायत समितीसमोरुन जात असताना जनावर बाजारातून गांजाची नशा करुन आलेल्या दोघा नशेखोरांनी भररस्त्यात नंगानाच केला. एसटीमिरज सिव्हीलमध्ये धिंगाणा घालताना नशेखोर अब्दुल्ला पटेल,थांबवून चालक परमेश्वर लामताने, वाहक महादेव शिंदे आणि गांधी चौकी पोलिस ठाण्याकडील पोलिस कर्मचारी कोंडीबा सरगर यांच्यावर चाकूने हल्ला करुन जबर मारहाण करण्यात आली. तसेच एसटीच्या काचाही फोडल्या. नशेखोरांचा डा हैदोस पाहून एसटीत असलेल्या ४० हून अधिक प्रवाशांची एकच धावपळ उडाली. काही नागरिकांनी संबंधीत नशेखोरांना चोप देऊन पोलिसांच्या स्वाधिन केले.
एसटीची तोडफोड करुन खुनी हल्ला केल्यानंतर संबंधीत नशेखोरांनी स्वत:वरही वार करवून घेतले होते. नशेखोर पूर्णपणे अनियंत्रित असल्यामुळे नागरिकांनीच त्यांना पकडून ठेवले होते. गांधी चौकी पोलिसांनी संबंधीत नशेखोरांना ताब्यात घेतले. जखमी पोलीस व एसटी कर्मचाऱ्यांवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. गंभीर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तर अटक करण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याआधी नशेखोरांवरही अत्यावश्यक सेवा विभागात उपचार सुरु होते.
सिव्हीलमध्ये दाखल केल्यानंतर संबंधीत नशेखोरांनी उपचार करुन घेण्यास नकार दिला. अंगाला स्पर्श करुन औषध लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही त्याने शिवीगाळ करुन ढकलून दिले. त्यानंतर नशेखोरांनी पोलिसांवरच वेगवेगळे आरोप करुन सिव्हीलमध्ये पुन्हा हैदोस घातला. सिव्हील हॉ स्पिटलच्या बाह्य रुग्ण विभागात काही फरशा फोडल्या. दरवाजावर लाथा मारुन दरवाजा उघडला. त्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराजवळ थांबवून पोलिसांनाच अश्लिल शिवीगाळ सुरू केली होती. मिरज सिव्हीलमध्ये रात्री दीड वाजेपर्यंत नशेखोरांचा हा तमाशा सुरूच होता.