For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Miraj Crime : महात्मा गांधी चौकात नशेखोरांची लोखंडी कड्याने मारहाण

05:20 PM Feb 02, 2026 IST | NEETA POTDAR
miraj crime   महात्मा गांधी चौकात नशेखोरांची लोखंडी कड्याने मारहाण
Advertisement

                           विकी वाघमारे यांना चहा पिताना अनाहूत मारहाण;

Advertisement

मिरज : शहरातील महात्मा गांधी चौक येथे एका चहाच्या टपरीवरतिघा नशेखोरांना धुमाकूळ घातला. चहा पित थांबलेल्या विकी राहूल वाघमारे (रा. म्हाडा कॉलनी, पाण्याच्या टाकीजवळ, मिरज) यांना धमकावून लोखंडी कड्याने मारहाण करुन जखमी केले. याबाबत वाघमारे यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे.

त्यानुसार संशयीत सराईत गुन्हेगार श्रीधर नंदू कदम, विश्वेश धोंडीराम घोडके व एक अनोळखी अशा तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. विकी वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते महात्मा गांधी चौक येथे ठक्कर चहा दुकानासमोर चहा पित थांबले होते. यावेळी एका काळ्या रंगाच्या चारचाकीतून संशयीत श्रीधर कदम, विश्वेश घोडके व एक अनोळखी असे तिघेजण दारु पिऊन आले. त्यांनी विकी वाघमारे यांना कोणतेही कारण नसताना शिवीगाळ करुन धमकावले. त्यानंतर विनाकारण मारहाण करण्यास सुरुवात केली.

Advertisement

यावेळी विश्वेश घोडके याने हातातील लोखंडी कड्याने मारहाण केल्याने विकी वाघमारे यांच्या डोळ्याजवळ दुखापत झाली. त्यानंतर संबंधीत संशयीत तिघे घटनास्थळावरुन पळून गेले. घडल्या प्रकारानंतर विकी वाघमारे यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील श्रीधर कदम व विश्वेश घोडके हे सराईत गुन्हेगार व नशेखोर असून, त्यांच्यावर यापूर्वी मिरज शहर पोलिसात वेगवेगळी गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना केली आहेत.

Advertisement
Tags :

.