Kolhapur News: बेंदराच्या तोंडावर बैलाचा तलावात बुडून मृत्यू, शेतकऱ्याला अश्रू अनावर
मशागतीनंतर बैलांना पाणी देण्यासाठी बैलजोडी मनपाडळे तलावापाशी आणली
By : शिवाजी पाटील
नवे पारगाव : हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे येथे तलावात जाखलेतील शेतकरी सुरज पाटील यांच्या बैलजोडीतील एक बैलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. जाखले येथील शेतकरी सुरज पाटील मनपाडळे गावच्या पश्चिमेस असणाऱ्या शेतात खरीप पूर्व मशागतीचे काम करण्यासाठी गेले होते होते. मशागत करून झाल्यानंतर बैलांना पाणी देण्यासाठी बैलजोडी मनपाडळे तलावापाशी आणली. पाणी पिण्यासाठी दोन्ही बैल तलावात गेले.
पाण्यात गेलेल्या बैलांसोबत बैलगाडी असल्याने बैलांना बाहेर येता आले नाही. यावेळी शेतकऱ्याने आरडा ओरडा केल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी जमून बैलाच्या गळ्यातील दोरी कापून एक बैल वाचवला पण दुसरा वाचवण्यात त्यांना अपयश आले. यामध्ये संबंधित शेतकऱ्याचे एक लाख तीस हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे पंचनामा करणारे पशुवैद्यकीय अधिकारी व तलाठी यांनी स्पष्ट केले.
सुरज पंडीत पाटील हे मनपाडळे येथे एका शेतकऱ्याच्या शेताची मशागत करण्यासाठी आले होते. बैलांना पाणी पाजण्यासाठी तलावाकडे घेऊन गेले असता बैलगाडी उधळून तलावातील खोल पाण्यात गेले. बैलगाडी असल्यामुळे त्यांना बाहेर येता आले नाही.
या घटनेते दोन्हीपैकी एका बैलाला वाचवण्यात यश आले. तर एक बैल मृत्यूमूखी पडला आहे. या घटनेमुळे शेतकरी सुरज पाटील यांना घटनास्थळी अश्रू अनावर झाले. सदर घटनेचा तलाठी सतीश नेवरेकर, पशुवैद्यकीय अधिकारी आरती दांडगे व पोलीस पाटील यांनी पंचनामा केला आहे.