For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रशियात बीचवर कोसळला ड्रोन 7 जणांचा मृत्यू : 40 जखमी

06:30 AM Aug 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
रशियात बीचवर कोसळला ड्रोन 7 जणांचा मृत्यू   40 जखमी
Advertisement

मॉस्को : दक्षिण रशियाच्या एका गर्दी असलेल्या बीचवर (समुद्र किनारा) ड्रोन कोसळल्याने तीन मुलांसमवेत 7 जणांचा मृत्यू झाला. तर जखमींची संख्या 40 वर पोहोचली असून 17 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे क्रास्नोदार क्षेत्राचे गव्हर्नर वेनियामिन कोंद्रात्येव यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी युक्रेनवर जाणूनबुजून सामानय लोकांवर हल्ले करण्याचा आरोप केलाआहे. इलेक्ट्रॉनिक वॉरफेयरमुळे (ज्यामुळे ड्रोनचा सिग्नल जाम झाला) हा ड्रोन बीचवर कोसळल्याचा दावा काही युक्रेनियन टेलिग्राम चॅनेल्सकडून करण्यात आला आहे. तर स्फोटापूर्वी गोळीबाराचा आवाज ऐकू आला होता असा दावा रशियाने अनेक प्रत्यक्षदर्शींचा दाखला देत केला आहे. यामुळे बहुधा हवाई सुरक्षा प्रणालीने ड्रोन पाडविण्याचा प्रयत्न केला असावा असे संकेत मिळत आहेत. ही घटना काळ्या समुद्रानजीक आर्खिपो ओसिपोव्का गावातील एका बीचवर घडली आहे. उन्हाळा, लांबच लांब समुद्र किनारा आणि विकसित पर्यटन सुविधांमुळे हे रशियाच्या लोकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. खासकरून निर्बंधांमुळे अनेक लोकांसाठी आंतरराष्ट्रीय प्रवास मर्यादित झाल्याने या ठिकाणाचे महत्त्व वाढले आहे. ड्रोन हल्ल्यापूर्वी कुठलाच सायरन वाजला नव्हता असे आर्खिपो-ओसिपोव्का येथील पर्यटक तसेच स्थानिक रहिवाशांनी सांगितले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.