वाहन चालकांच्या पोरानं वेटलिप्टींगमध्ये पटकावलं सुवर्णपदक
एका वर्षात दोन सुवर्णपदकाला गवसणी देत दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड
उमदी प्रतिनिधी
ठाणे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय वेटलिप्टींग स्पर्धेत उमदी येथील एम.व्ही.हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज चा विद्यार्थी निखिल नागेश कोळी यांने ५५ किलो वजन गटात २०४ किलो वजन उचलुन सुवर्णपदक पटकावले. या यशाची माहिती मिळताच खाजगी गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत असलेले निखिलचे वडील नागेश कोळी यांना आनंदाश्रू अनावर झाले.
उमदी ता.जत येथे सर्वोदय शिक्षण संस्थेच्या महात्मा विद्यामंदिर या शाखेत शिक्षण घेत असलेल्या निखिल कोळी यांने या अगोदर संभाजीनगर येथे असोशियनच्या माध्यमातून पार पडलेल्या राज्यस्तरीय वेटलिप्टींग स्पर्धेत देखील सुवर्णपदक पटकावले असून त्यांची अरुणाचल प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच ठाणे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय वेटलिप्टींग स्पर्धेत देखील निखिल कोळी यांने सुवर्णपदक पटकावल्याने त्यांची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय वेटलिप्टींग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे वेटलिप्टींग स्पर्धेत सांगली जिल्ह्याचे वेट वाढले आहे.
एका वर्षात दोन सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. तसेच निखिल कोळी यांचे वडील हे खाजगी गाडी चालवत. घरची परिस्थिती हलाखीची असताना देखील प्रशिक्षक संजय नांदणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली निखिल याला सन २०१७ पासून वेटलिप्टींगचे प्रशिक्षण देत आहेत.
या यशानंतर सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महादेवप्पा होर्तीकर, उपाध्यक्ष रेवाप्पाण्णा लोणी, सचिव एस.के.होर्तीकर, प्राचार्य एस.सी.जमादार, उपप्राचार्य डी.सी.बासरगांव, उपमुख्याध्यापक सी.एस.धायगुडे, पर्यवेक्षक एम.बी.शिंदे यांनी संस्थेच्या व प्रशालेच्या वतीने प्रशिक्षक संजय नांदणीकर व सुवर्णपदक विजेता निखिल कोळी यांचे अभिनंदन केले.