For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बसवनमर्डीनजीक ट्रॅक्टर उलटून चालक ठार

03:45 PM Apr 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
बसवनमर्डीनजीक ट्रॅक्टर उलटून चालक ठार
Advertisement

हिरेबागेवाडी पोलिसांत अपघाताची नोंद

Advertisement

बेळगाव : भरधाव ट्रॅक्टर उलटून ट्रॅक्टरचालक जागीच ठार झाला. तर आणखी एक जण जखमी झाला. बडाल अंकलगी येथील बसवनमर्डीजवळ रविवारी सकाळी ही घटना घडली असून हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. मारुती रुद्राप्पा अलाबादी (वय 25), रा. बडस के. एच., ता. बेळगाव असे त्याचे नाव आहे. ट्रॅक्टरमध्ये बसलेला बसाप्पा सन्नमल्लाप्पा कुडची (वय 52), राहणार बडाल अंकलगी हा गंभीर जखमी झाला आहे. ट्रॅक्टर इंजिनवरून बसवनमर्डीकडे जाताना चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर रस्त्याशेजारी उलटला. या अपघातात चालक ठार झाला.

Advertisement
Advertisement
Tags :

.