For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंध्रात बस-ट्रक धडकेत चालक ठार, 7 प्रवासी जखमी

06:42 AM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
आंध्रात बस ट्रक धडकेत चालक ठार  7 प्रवासी जखमी
Advertisement

नेल्लोर

Advertisement

आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात रविवारी सकाळी हैदराबादहून तिरुपतीला जाणाऱ्या टीएसआरटीसी परिवहन बसची ट्रकला धडक बसली. मोचेर्ला गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या अपघातात बसचालक विनोद याचा मृत्यू झाला असून 7 प्रवासी जखमी झाले आहेत. या सर्वांना उपचारासाठी नेल्लोर येथील अपोलो ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमी प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली. पहाटेच्या सुमारास परिसरात पडलेल्या धुक्यामुळे दृश्यमानता कमी होऊन हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.