सदलगा-एकसंबा रोडवर दोन ट्रकच्या धडकेत चालक जखमी
12:22 PM Oct 20, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
वार्ताहर/मलिकवाड
Advertisement
येथील परिसरातील सदलगा-एकसंबा रोडवर रविवारी सायंकाळी 6.30 वाजता भीषण अपघात झाला. दोन ट्रकांची समोरासमोर धडक होऊन दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही चालक गंभीररित्या जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, केए 48 ए 1919 आणि एमएच 19 आर 4138 हे दोन ट्रक सायंकाळच्या सुमारास सदलगा-एकसंबा मार्गावर वेगाने जात असताना एकमेकांना जोरदार धडकले. धडकेचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक धावून आले. स्थानिकांच्या मदतीने दोन्ही चालकांना बाहेर काढून तात्काळ चिकोडी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक पुन्हा सुरू केली. अति वेग आणि चुकीच्या ओव्हरटेकमुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेचा अधिक तपास सदलगा पोलीस करत आहेत.
Advertisement
Advertisement
Next Article