For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उचगाव येथील चालकाला फसवणूक प्रकरणी अटक

08:12 AM Aug 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
उचगाव येथील चालकाला फसवणूक प्रकरणी अटक
Advertisement

 त.भा.प्रतिनिधी  

Advertisement

बेळगाव : मालमत्तेचे मालक आपणच असल्याचे सांगत उपनोंदणी कार्यालयात भलत्यांचीच मालमत्ता आपली असल्याचे सांगून त्याची विक्री करणाऱ्या उचगाव येथील एका वाहन चालकाला मार्केट पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे.

कलंदर गुलाब पटेल (वय 53, रा. अनगोळ गल्ली, उचगाव) असे मार्केट पोलिसांनी अटक केलेल्या वाहन चालकाचे नाव आहे. पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमीर्ची, उपनिरीक्षक हुसेनसाब केरुर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. 4 जानेवारी 2025 रोजी उचगाव येथील रफीक इमाम शहापूरकर यांनी मार्केट पोलीस स्थानकात दाखल केलेल्या फसवणूक प्रकरणाच्या तपासावेळी कलंदरला अटक करण्यात आली आहे.

Advertisement

पोलिसांनी कलंदरला ताब्यात घेऊन उचगाव येथील जमीन व्यवहारासंबंधी चौकशी केली असता रफीक यांच्या चुलत्याच्या नावे असलेल्या मालमत्तेचे मूळ मालक आपणच असल्याचे सांगत कलंदरने उपनोंदणी कार्यालयात वेब कॅमेऱ्यामध्ये फोटो काढून घेऊन बोटांचे ठसेही दिले होते. फसवणूक करण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी कलंदरला अटक केली आहे.

Advertisement
Tags :

.