डोळ्यादेखत माणसाचा झाला कोळसा
सीएनजी कारने पेट घेतल्यामुळे चालक जळून खाक
डोळ्यात देखत माणसात झाला कोळसा
सांगली :
कोल्हापूर-नागपूर महामार्गावर बोरगाव टोलनाक्यापासून 300 मीटर अंतरावर व्हॅगेनॉर कंपनीच्या सीएनजी कारने अचानक पेट घेतल्याने झालेल्या दुर्घटनेत कवठेमंकाळ येथील वीस वर्षीय वाहन चालक गणेश माळवदे याचा गाडीतच जळून कोळसा झाल्याची दुर्घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. संपूर्ण जिल्ह्यात या घटनेने खळबळ माजली आहे.
याबाबत महामार्ग पोलीस विभागाचे निरीक्षक युवराज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेनऊच्या सुमारास कवठेमंकाळ येथील गणेश विश्वनाथ माळवदे हा वीस वर्षाचा युवक त्याच्या वॅगेनॉर गाडीमध्ये सीएनजी गॅस भरून आणण्यासाठी निघाला होता. कवठेमंकाळ तालुक्यातील बोरगाव येथे टोलनाक्यापासून 300 मीटर अंतरावर अचानक त्या गाडीने पेट घेतला. आग लागलेल्या अवस्थेतच धावती गाडी समोर येत असल्याचे नाक्यावरील कर्मचारी आणि वाहन चालक पाहत होते. या घटनेने टोल नाक्यावर एकच तारांबळ उडाली. इतक्यात चालकाने गाडी एका बाजूला वळवल्याचे लक्षात आले. रस्त्याकडेला असलेल्या आयशर जवळच त्या गाडीत आगीचा भडका उडाला. वाहन चालक माळवदे याने गाडीचे स्टेअरिंग सोडून दुसऱ्या बाजूने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी आजीचा जोर वाढल्याने तो त्यातच होरपळला. दरम्यान घटनास्थळी पोलीस आणि टोल नाक्यावरील कर्मचारी धावले. मात्र पेटत्या गाडीमुळे त्यांना जवळ जाणेही मुश्किल झाले होते. प्रथम दर्शनी चालकाच्या जागेवर कोणी नसल्याने आज कोणी नसावेत आणि पेठ घेतल्याने चालकाने गाडी सोडून दिली असावी असा संशय होता. मात्र काही वेळातच चालक दुसऱ्या बाजूच्या सीटवर असल्याचे आणि तो जागेवरच जळून खाक झाला असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले.
डोळ्यादेखत दुर्घटना घडलेली असताना सुद्धा आगीच्या भडक्यामुळे पोलीस आणि इतरांना कोणालाही जवळ जाऊन बचाव कार्य करता आले नाही अशी खंत यावेळी पोलिसांनी बोलून दाखवली. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याची कोणतीही माहिती अध्याप स्पष्ट झालेली नाही. सदरच्या प्रकरणी कवठेमंकाळ पोलीस ठाण्यामध्ये नोंद होईल आणि चौकशी अंतीच नेमके काय घडले ते समजू शकेल, असे निरीक्षक युवराज पाटील यांनी सांगितले.