21 मे रोजी झळकणार ‘दृश्यम 3’
मोहनलाल यांचा जॉर्जकुट्टी अवतार पुन्हा परतणार आहे. मोहनल यांचा चित्रपट ‘दृश्यम 3“चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यावेळच्या कहाणीत खूप काही पणाला लागलेले आहे, पोलीस लोक तसेच जॉर्जकुट्टीच्या परिवारातही संशय बळावत चालला आहे. मोहनलाल हे स्वत:च्या त्याच अवतारात परंतु अत्यंत नव्या शैलीत दिसून येत आहेत.
दृश्यम 3 च्या ट्रेलरच्या प्रारंभी जॉर्जकुट्टी स्वत:च्या घरात पत्नी आणि मुलींसोबत संभाषण करताना दिसून येतात. भूतकाळात आपण पोलिसांसोबत ज्याप्रकारे गुंतले गेलो होतो ते आता संपले आहे असे परिवाराला वाटत असते. परंतु जॉर्जकुटीला यावर विश्वास नसतो.
जॉर्जकुट्टी आणि त्याच्या परिवारामागे तपास यंत्रणांचा एक समूह मागे लागतो, परंतु त्यामागील कारण ट्रेलरमध्ये स्पष्ट करण्यात आलेले नाही. परंतु यावेळी जॉर्जकुट्टीला सदैव दक्ष रहावे लागेल अशी हिंट प्रेक्षकांना मिळते. हा चित्रपट 21 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचदिवशी मोहनलाल यांचा जन्मदिन आहे.
दृश्यम 3 चित्रपटाचे दिग्दर्शन जीतू जोसेफ यांनी केले आहे. तर आशीर्वाद सिनेमाजचे एंटनी पेरुम्बावूर यांनी याची निर्मिती केली आहे. दृश्यम आणि दृश्यम 2 हे चित्रपट देशभरात गाजले आणि त्यांचा हिंदी, सिंहली, मंदारिन आणि कोरियनसमवेत अनेक भाषांमध्ये रिमेकही झाला.