महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची चाचणी

10:57 AM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चार तज्ञ अभियंत्यांची नेमणूक : अहवाल सादर : लवकरच कळणार पाणी योग्य की अयोग्य

Advertisement

बेळगाव : ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणी मिळावे यासाठी प्रत्येक ग्रा. पं. कार्यक्षेत्रात पाण्याची चाचणी केली आहे. 57 ग्रा. पं. च्या हद्दीतील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याची चाचणी केली आहे. शिवाय याबाबतचा अहवाल तज्ञ अभियंत्यांनी पाणीपुरवठा मंडळाकडे दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात संबंधित ग्रा. पं. चे पाणी पिण्यास योग्य आहे की नाही, हे समजणार आहे. बेळगाव तालुका पंचायतीच्या कार्यक्षेत्रात 57 ग्रा. पं. चा समावेश आहे. दरम्यान या ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील पाण्याच्या दर्जाबाबत चाचणी केली आहे. ग्रामीण भागाला पुरवठा होणारे पाणी शुद्ध आहे की नाही. शिवाय ते पिण्यास योग्य की अयोग्य, यासाठी पाण्याची चाचणी करण्यात आली आहे. विशेषत: ग्रामीण भागात विहिरी आणि कूपनलिकामार्फत पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, काही पाणी पिण्यास योग्य नसते. त्यामुळे जनतेला आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. यासाठी तालुका पंचायतमार्फत ही मोहीम राबविण्यात आली आहे. यासाठी चार तज्ञ अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Advertisement

जलकुंभ-पाण्याच्या टाक्यांची पाहणी 

सध्या डेंग्यू आणि मलेरिया रोगाने डोके वर काढले आहे. त्यामुळे आरोग्य खात्याची झोप उडाली आहे. यासाठी पाण्याच्या चाचणीबरोबर तलाव, नाले, जलकुंभ आणि पाण्याच्या टाक्यांची पाहणी करण्यात आली आहे. विशेषत: जलवाहिन्यांना गळती लागून दूषित पाण्याचा पुरवठा होत असतो. यातूनच विविध आजारांची लागण होते. यासाठी ता. पं. ने प्रत्येक ग्रा. पं. कार्यक्षेत्रात शुद्ध पाण्याबरोबर जलकुंभ आणि पाण्याच्या टाक्यांची पाहणी केली आहे.

पाणीपुरवठा मंडळाकडे अहवाल सादर

बेळगाव तालुक्यातील काकती, न्यू वंटमुरी, मोदगा, हिंडलगा, उचगाव, येळ्ळूर, बेळगुंदी, बिजगर्णी, तुम्मरगुद्दी, बाळेकुंद्री, मास्तमर्डी, सुळेभावी, करडीगुद्दी, देसूर यासह इतर सर्वच ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील शुद्ध पाण्याची चाचणी केली आहे. शिवाय याबाबतचा अहवाल पाणीपुरवठा मंडळाकडे सादर केला आहे.त्यामुळे येत्या काळात बेळगाव तालुक्यातील पिण्याचे पाणी पिण्यास योग्य आहे की नाही हे समजणार आहे. पावसाळ्यात तलाव, नदी, नाले आणि विहिरी प्रवाहीत होतात. यामधील देखील पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जातो. मात्र या पाण्यामध्ये क्षारता, नायटेट आणि फॉस्फेट यांचे प्रमाण किती आहे, याची माहितीही घेतली जाणार आहे. त्याबरोबर बॅक्टेरिया खनिज, पीएच आदी चाचण्याही केल्या जाणार आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article