महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खोची गावची पेयजल योजना रखडली; तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा इशारा

05:34 PM Jan 24, 2024 IST | Kalyani Amanagi
Advertisement

खोची प्रतिनिधी

Advertisement

अनेक अडथळ्याच्या शर्ती पार करत खोची येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत पेयजल फिल्टर हाऊस व जलकुंभाचे काम पूर्ण होऊन तीन महिने झाले.मात्र या योजनेसाठी वीज कनेक्शन मिळण्यासाठी शासन व महावितरण कंपनी यांच्या समन्वयाअभावी मोठे अडथळे निर्माण झाले आहेत.एकंदरीत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे ७ हजार लोकसंख्या असलेल्या खोची गावाला शुद्ध पाण्यापासून अजूनही वंचित राहावे लागणार आहे.

Advertisement

अनेक वर्षापासून खोची ता. हातकणंगले गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी पेयजल योजनेची मागणी होती. त्यासाठी अनेक वेळा पाठपुरावा केला. पण ती तांत्रिक बाबीमुळे मंजूर होत नव्हती.अखेर सन २०२०-२१ मध्ये ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनेच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत अंतर्गत ही योजना मंजूर झाली.यामध्ये नवीन ४ लाख लिटर क्षमतेची उंच टाकी,फिल्टर प्लॅंट व टाकीला नदीतून पाणी पुरवठा व टाकी पासून मुख्य वितरण नलिका यासाठी एक कोटी ९० लाख निधी मंजूर झाला.तीन महिने झाले अनेक अडथळ्याच्या शर्ती पार करत अखेर ही योजना पूर्णत्वाकडे गेली आहे. यासाठी खोची ग्रामपंचायतीने फिल्टर हाऊसला लागणाऱ्या विद्युत कनेक्शन मंजुरीसाठीचा प्रस्ताव महावितरण कंपनीकडे ऑक्टोंबर २०२३ मध्ये सादर केला आहे.पण विद्युत कंपनीने आपली २०२२ पूर्वीची थकबाकी शासनाने अद्याप भरली नसल्याने आपले वीज कनेक्शन देणेबाबत वरिष्ठ पातळीवर विचारणा व मार्गदर्शन घेणे चालू आहे.याबाबत शासनाकडून आदेश आल्याशिवाय ग्रामपंचायतीस कनेक्शन देता येणार नाही,असे सांगून कनेक्शन देणे थांबवले आहे.

शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग क्रमांक संकीर्ण २०२२/ परिपत्रक क्रमांक ३३३/ ऊर्जा ५ जानेवारी २०२३ चे परिपत्रकाप्रमाणे जून २०२२ पूर्वीची थकबाकी शासन भरणार आहे.असा जीआर सुध्दा निघाला आहे.खोची ग्रामपंचायतीने ५ जानेवारी २०२३ च्या पत्राप्रमाणे २०२२ नंतरची नळ पाणीपुरवठा योजनेची सर्व बिले महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीकडे भरली आहेत.

२०२२ नंतरची खोची ग्रामपंचायतीकडे कोणत्याही प्रकारची महावितरणची थकबाकी नाही.विद्युत वितरण कंपनी व महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये समन्वय नसल्याने सदर योजना लांबणीवर पडत आहे.याबाबत पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांना भेटून निवेदन देऊन दाद मागणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.बी.के.चव्हाण यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.यामध्ये जरी काही तोडगा न निघाल्यास खोची ग्रामस्थांच्या वतीने विद्युत वितरण कंपनी विरोधात तीव्र आंदोलन उभारणार असल्याचे सांगितले.

खोची ग्रामस्थांना शुद्ध,स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन कटिबद्ध आहे. यासाठी आवश्यक असलेली नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली आहे. मात्र वीज कनेक्शन अभावी काम रखडले आहे.वीज कनेक्शन लवकरात लवकर मिळावे.यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.२०२२ पूर्वीचे ग्रामपंचायत थकबाकी शासन भरणार आहे.हे २०२३ मध्येच जाहीर झाले आहे.मात्र या थकबाकीसाठी खोची येथील नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी वीज कनेक्शन देणे महावितरण कंपनीने थांबवले आहे.
अभिजीत चव्हाण(ग्रामपंचायत,खोची)

ऑक्टोबर २०२३ मध्ये खोची ग्रामपंचायतची वीज कनेक्शनची मागणी आम्ही मंजुरीसाठी पुढे पाठवली आहे.महावितरणच्या २०२२ पूर्वीच्या ग्रामपंचायतच्या थकबाकी बाबत निर्माण झालेला पेच शासन दरबारी निकाली लागणे अपेक्षित आहे.खोची ग्रामपंचायतीला वीज कनेक्शन देण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून आम्हाला मंजुरीचे आदेश आल्याखेरीज आम्ही काहीही हस्तक्षेप करू शकत नाही.
शुभम चौगुले,कनिष्ठ अभियंता
बुवाचे वठार कार्यालय

खोची ग्रामपंचायतीची २०२२ पूर्वीची पाणीपुरवठ्याची थकबाकी तीन लाख वीस हजार एवढीच आहे.जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीची २०२२ ची पूर्वीची महावितरणची थकबाकी ३० लाखापासून पुढे आहे.त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्या आहेत.त्यांना वीज कनेक्शन मिळण्यासाठी सुद्धा अशा अडचणी निर्माण होणार आहेत.त्यामुळे महावितरणच्या थकबाकी बाबत शासनाने योग्य तोडगा काढणे महत्त्वाचे आहे.

Advertisement
Tags :
agitationdrinkingKhochischemestalledtarunbharatvillagewater
Next Article