For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ड्रीमलायनरच्या फ्यूल कंट्रोल स्वीचची तपासणी सुरू

06:18 AM Feb 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
ड्रीमलायनरच्या फ्यूल कंट्रोल स्वीचची तपासणी सुरू
Advertisement

लंडन-बेंगळूर विमानाचे स्वीच लॉक न होण्याची घटना : विमानाच्या उड्डाणावर बंदी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

एअर इंडियाने स्वत:च्या सर्व 787 ड्रीमलायनर विमानांच्या फ्यूल कंट्रोल स्वीचची पुन्हा तपासणी सुरु केली आहे. हा निर्णय लंडनच्या हीथ्रो येथून बेंगळूरसाठी रवाना होणाऱ्या विमानाच्या फ्यूल कंट्रोल स्वीचमधील गडबड समोर आल्यावर घेण्यात आला आहे. संबंधित विमानात 200 प्रवासी होते. एअर इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनीष उप्पल यांनी बोइंग 787 च्या वैमानिकांना ईमेल पाठवून ही माहिती दिली आहे. सध्या एअर इंडियाच्या ताफ्यात 32 बोइंग 787 विमाने आहेत.

Advertisement

फ्यूल कंट्रोल स्वीचच्या लॅचचे खबरदारीदाखल फ्लीड-वाइड री-इन्स्पेक्शन केले जात आहे. इंजिनियरिंग टीमला बोइंग कंपनीकडे पाठविण्यात आले आहे. कंपनीकडुन उत्तर मिळेपर्यंत अतिरिक्त सतर्कता बाळगत सर्व विमानांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या विमानांच्या तपासणीत कुठलीच गडबड दिसून आलेली नाही असे उप्पल यांनी ईमेलमध्ये म्हटले आहे.

संचालनादरम्यान दिसणारी कुठलीही तांत्रिक गडबड त्वरित नोंदवा, विमानाचा हँडओव्हर घेण्यापूर्वी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण कराव्या असे एअर इंडियाने स्वत:च्या कर्मचाऱ्यांना सांगितले आहे.

बोइंग 787 विमानातील फ्यूल कंट्रोल स्वीचमधील बिघाडाबद्दल एका वैमानिकाने सोमवारी माहिती दिली होती. स्वीच लॉक झाल्याचे त्याने कळविले होते. हे विमान रविवारी लंडनच्या हीथ्रो विमानतळावरून रवाना होत सोमवारी सकाळी बेंगळूर येथे पोहोचले हेते. बिघाडाची नोंद झाल्यावर विमानाच्या उ•ाणावर बंदी घालण्यात आली आहे.

अहमदाबाद दुर्घटनेची पार्श्वभुमी

जून महिन्यात अहमदाबाद येथे 787-8 विमान कोसळण्याच्या दुर्घटनेच्या प्रारंभिक तपास अहवालात टेक-ऑफच्या त्वरित नंतर इंधन पुरवठा थांबला होतासे नमूद करण्यात आले होते. यामुळे फ्यूल कंट्रोल स्वीचवर खास लक्ष देण्यात येत आहे. अहमदाबाद येथील दुर्घटनेत 260 जणांना जीव गमवावा लागला होता. एअर इंडियाने या दुर्घटनेनंतर मागील वर्षी फ्यूल कंट्रोल स्वीचची तपासणी करविली होती.

फ्यूल कंट्रोल स्वीचचे कार्य अन् तंत्रज्ञान

फ्यूल कंट्रोल स्वीच विमानाच्या कॉकपिटमध्ये थ्रस्ट लीवरनजीक असतात. हे इंजिनमध्ये इंधनाच्या पुरवठ्याला नियंत्रित करतात. याचे मुख्य कार्य इंजिनमध्ये इंधनाच पुरवठा सुरू करणे (रन पोझिशन) किंवा बंद करणे (कटऑफ पोझिशन) आहे. प्रत्येक इंजिनसाठी वेगवेगळा फ्यूल कंट्रोल स्वीच असतो. बोइंग 787 मध्ये दोन इंजिन्स असतात, यामुळे दोन स्वीच असतात.

Advertisement
Tags :

.