कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वयाच्या 99 व्या वर्षी पूर्ण झाले स्वप्न

06:47 AM Apr 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हातात बेड्या ठोकून घेण्याचे होते स्वप्न

Advertisement

प्रत्येक माणसाची स्वप्नं असतात, कुणी श्रीमंत होऊ इच्छितो, तर कुणी कार खरेदी करू इच्छितो, परंतु कधी कुणाला अटक होण्याची इच्छा असल्याचे कधी ऐकले आहे का? एका वृद्ध महिलेच्या कहाणीने सर्वांची मने जिंकली आहेत. कारण या या महिलेचे कधीतरी स्वत:च्या हातात बेड्या ठोकल्या जाव्यात, कधीतुरी तुरुंगात जावे, असे स्वप्न होते. तिचे हे स्वप्न वयाच्या 99 व्या वर्षी पूर्ण झाले आहे.

Advertisement

सोशल मीडियावर या कहाणीला महिलेच्या छायाचित्रांसह शेअर करण्यात आले आहे. नेदरलँडच्या 99 वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली, तिच्या हातात बेड्या ठोकल्या आणि तुरुंगात डांबले. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे तिने कुठलाच गुन्हा केला नव्हता. पोलिसांनी ही कारवाई केवळ महिलेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केली आहे. तिच्या जीवनात काही इच्छा होत्या, ज्या मृत्यूपूर्वी पूर्ण करण्याची तिची इच्छा होती.

99 वर्षीय महिलेला अटक

अॅमस्टरडॅमनजीक नीजमेगेन झुइडच्या पोलीस स्थानकात एनी नावाच्या महिलेला तुरुंगात काही काळ घालविण्याची संधी देण्यात आली. तिच्या अखेरच्या इच्छांपैकी ही एक होती. या महिलेची पुतणी आमच्याकडे आली होती, एनी यांची तुरुंगात काही काळ घालविण्याची इच्छा असल्याचे तिने आम्हाला सांगितल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. छायाचित्रांमध्ये संबंधित महिलेला अत्यंत आनंदी पाहिले जाऊ शकते. तर महिलेची इच्छा पूर्ण केल्यामुळे पोलिसांचे देखील कौतुक झाले आहे.

इन्स्टाग्रामवरील या पोस्टला हजारो लोकांनी लाइक केले आहे. तर अनेकांनी कॉमेंट केली आहे. महिला अत्यंत आनंदी दिसत असल्याचे एका युजरने म्हटले आहे. तर 100 वर्षांचे वय झाल्यावर अटक झाल्यास कसे वाटत असावे अशी विचारणा अन्य युजरने केली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article