महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘रंग-संगीत‘ कार्यशाळेतून नाट्या प्रात्यक्षिकांचे धडे

04:37 PM Jan 14, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement

शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना डॉ. साईश देशपांडे यांचे मार्गदर्शन

Advertisement

कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्याशास्त्र अधिविभागामध्ये ‘रंग-संगीत: प्रस्तावना व परिचय’ ही नाट्या व संगीतविषयक दोन दिवसीय कार्यशाळा डॉ. साईश देशपांडे (गोवा) यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहात पार पडली.
संगीत व नाट्याशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात संगीत व नाटकांचे गाढे अभ्यासक तथा तज्ञ मार्गदर्शक असलेल्या देशपांडे यांनी सहभागी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. अभिनय करत असताना नाटकामध्ये संगीताचा वापर कसा करावा, संगीताचे महत्त्व, शारीरिक हालचालीतून, संवादातून संगीत कसे निर्माण होते, पार्श्वसंगीताचा आधार कसा घ्यावा, स्वर, आवाजाची पट्टी, लय, ताल या मूलभूत सांगितिक घटकांनुसार संवादाचे सादरीकरण, उच्चारण कसे असावे, याबद्दल डॉ. देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. अधिविभागप्रमुख डॉ. विनोद ठाकूर-देसाई यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. रविदर्शन कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला.
राज्य नाट्या स्पर्धेतील डॉ. संजय तोडकर दिग्दर्शित ‘भाऊबंदकी’ नाटकातील यशस्वी विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. राजश्री खटावकर यांनी आभार मानले.

Advertisement

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article