For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुन्हा पॅरिसमध्ये एमिलीच्या आयुष्यात होणार ड्रामा

06:48 AM Sep 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
पुन्हा पॅरिसमध्ये एमिलीच्या आयुष्यात होणार ड्रामा
Advertisement

ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही वेबसीरिजची इतकी क्रेझ आहे की निर्मात्यांना याचे अनेक सीझन तयार करावे लागले आहेत यातील एक अमेरिकन रुमानी कॉमेडी ड्रामा एमिली इन पॅरिस  आहे. 4 हिट सीझन्सनंतर एमिली इन पॅरिसचा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अलिकडेच याच्या पाचव्या सीझनच्या प्रदर्शनाची तारीख उघड करण्यात आली आहे.  एमिली इन पॅरिसमध्ये तिच्या प्रेमळ आयुष्याचा एक तुकडा सादर करत आहोत अशी कॅप्शन देत याचा फर्स्ट लुक शेअर करण्यात आला आहे. याच्या पहिल्या छायाचित्रात एमिली फॅशनिस्टा लुकमध्ये दिसून येत आहे. तर नेहमीप्रमाणे ती स्वत:चा फॅशन गोल फ्लॉन्ट करत आहे. दुसऱ्या छायचित्रात लिली कॉलिन्स म्हणजेच एमिली ही प्रियकर एल्फीसोबत दिसून येत आहे.  एमिली इन पॅरिसचा पाचवा सीझन 18 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्सच्या या सीरिजमध्ये लिली कॉलिन्ससोबत मुख्य भूमिकेत लुकास ब्रेवो, एशली पार्क, कॅमिली रजात, लुसियन लेविसकाउंट आणि युजेनियो फ्रांसेचिनी हे कलाकार आहेत. मार्केटिंग टीमची एक्झिक्यूटिव्ह एमिली कशाप्रकारे स्वत:चे वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींना मॅनेज करते यावर याची कहाणी गुंफण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.