For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कामगार कल्याण मंडळाचा नाट्य महोत्सव 2 जानेवारीपासून

03:07 PM Dec 28, 2023 IST | Kalyani Amanagi
कामगार कल्याण मंडळाचा नाट्य महोत्सव 2 जानेवारीपासून
Advertisement

तब्बल 18 नाटकांची मेजवानी : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहात आयोजन : मोफत प्रवेश

Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पुणे विभागाच्या वतीने 2 ते 25 जानेवारी 2024 या कालावधीत (शनिवार व रविवार नाटकास सुट्टी) सायंकाळी 7 वाजता येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहात 69 वा प्राथमिक नाट्या महोत्सव 2023चे आयोजन केले आहे. विभागीय प्राथमिक नाट्या महोत्सव आयोजनाचा मान यंदाही सलग तिसऱ्या वर्षी कोल्हापूरलाच मिळाला आहे.

Advertisement

या नाट्या महोत्सवात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथील 18 नाट्याप्रयोग सादर होणार आहेत. कामगारांसह इतरही कलावंतांचा एकत्रीत अविष्कार असणारी विविध विषयांची व वैविध्यपूर्ण मांडणी असणारी नाटके या नाट्यामहोत्सवात नाट्यारसिकांना पाहता येणार आहेत. बहुतांशी नाटकांमधुन सामाजिक जाणीवा समृध्द करण्याचा प्रयत्न कामगार नाट्या स्पर्धा करत आलेल्या आहेत. समाजभान जागे करत ही सांस्कृतिक घौडदौड साधारणपणे 69 वर्ष अखंडपणे सुरु आहे. कामगार नाट्या स्पर्धेच्या या मंचावर केव्हातरी पाय ठेवुन आज नाट्या, सिने व टीव्ही सृष्टीमधील कितीतरी दिग्गज आपल्या कार्यकर्तृत्वाचा डंका मिरवत आहेत. त्यांनी जाणीवपूर्वक या नाट्या महोत्सवाचा उल्लेख सातत्याने केलेला आहे. यावर्षी सन 23-24 चा हा नाट्यामहोत्सव कोल्हापुरकरांना बाहेरील नाटके मोफत पाहण्याची संधी देणार आहे.

नाट्या महोत्सवाचे उद्घाटन दिनांक 2 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार जयश्री जाधव, तर अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते शरद भुताडीया असणार आहेत. त्याचबरोबर जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हाधिकारी, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. नाट्या महोत्सव महाराष्ट्राचे कल्याण आयुक्त रविराज ईळवे, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुण्याचे सहाय्यक कामगार कल्याण आयुक्त मनोज पाटील, कोल्हापूरचे कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांच्या प्रमुख संयोजनात पार पडणार आहे. या संधीचा लाभ रसिक प्रेक्षकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

‘युगे युगे शहामृगे’ नाटकाने महोत्सवाला सुरूवात

या नाट्या महोत्सवात कामगार कल्याण केंद्र, सागरमाळ, कोल्हापूर यांचे युगे युगे शहामृगे हे पहिले नाटक 2 जानेवारीला उद्घाटनावेळी सादर होणार आहे. मोफत प्रवेशिका कामगार कल्याण मंडळाच्या बिंदू चौक येथील कार्यालयातुन सन्मानिका सुध्दा उपलब्ध आहेत.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या 69 वा नाट्या महोत्सवात नाट्या रसिकांना अठरा नाटके पाहणी संधी मिळार आहे. सर्व नाटके पाहण्यासाठी मोफत असणार आहे. नाट्यारसिकांनी त्याचा लाभ घ्यावा.
-विजय चंद्रकांत शिंगाडे, कामगार कल्याण अधिकारी, कोल्हापूर

वार, तारीख, नाटकाचे नाव, सादरकर्ते :

मंगळवार 2 जानेवारी : युगे युगे शहामृगे : सागरमाळ कामगार कल्याण केंद्र, बुधवार 3 जानेवारी : आम्ही दोघेच राहायचो घरात, कामगार कल्याण केंद्र सातारा, गुरूवार 4 जानेवारी : महाशुन्य : कामगार कल्याण केंद्र इचलकरंजी, शुक्रवार 5 जानेवारी : कुछ ना कहो, कामगार कल्याण केंद्र फुलेवाडी, सोमवार 8 जानेवारी : नाटक, कामगार कल्याण केंद्र संभाजीनगर, मंगळवार 9 जानेवारी द सुसाईड पॅकेज, कामगार कल्याण केंद्र कागल, बुधवार 10 जानेवारी : एक शून्य बाजीराव, कामगार कल्याण केंद्र वारणानगर, गुरूवार 11 जानेवारी : कोण म्हणतं टक्का दिला, कामगार कल्याण केंद्र सणसवाडी, शुक्रवार 12 जानेवारी : गटार, कामगार कल्याण केंद्र उद्योगनगर, सोमवार 15 जानेवारी : बॅलन्सशिट : ललित कला भवन सांगली, मंगळवार 16 जानेवारी : विठु माझा लेकुरवाळा, कामगार कल्याण केंद्र दमाणीनगर, बुधवार 17 जानेवारी : जगी धन्य तो, ललित कला भवन रविवार पेठ, गुरूवार 18 जानेवारी पाय टाकुल जळात बसला, ललित कला भवन सदरबाजार, शुक्रवार 19 जानेवारी दुभंगुन जाता जाता, कामगार कल्याण केंद्र सिद्धेशवर नगर, सोमवार 22 जानेवारी चित्रकथी, कामगार कल्याण केंद्र संभाजीनगर, पुणे, मंगळवार 23 जानेवारी : मोरूची मावशी, कामगार कल्याण केंद्र बिंदू चौक, बुधवार 24 जानेवारी : सामसुम, कामगार कल्याण भवन, सहकार नगर पुणे, गुरूवार 25 जानेवारी : गेले उंदीर, कामगार कल्याण केंद्र कराड.

(टीम : सर्व नाटकाचे प्रयोग सायंकाळी 7 वाजता सुरू होतील. )

Advertisement
Tags :

.