For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अशोकनगर-चौथा क्रॉस परिसरात ड्रेनेज समस्या गंभीर

09:52 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
अशोकनगर चौथा क्रॉस परिसरात ड्रेनेज समस्या गंभीर
Advertisement

वारंवार मागणी करूनही मनपाचे दुर्लक्ष : नागरिकांतून संताप

Advertisement

बेळगाव : शहरातील काही भागामध्ये ड्रेनेजची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. याबाबत महानगरपालिकेकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जनतेतून होत आहे. अशोकनगर येथील चौथा क्रॉस परिसरात ड्रेनेज ब्लॉक होऊन अनेकांच्या घरांमध्ये ड्रेनेजचे पाणी साचून आहे. त्यामुळे त्यांना त्या घरामध्ये राहणे अवघड झाले आहे. याकडे महानगरपालिका लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशोकनगर परिसरात वारंवार ड्रेनेज ब्लॉक होण्याच्या घटना घडत आहेत. पावसाळ्यात तर गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. अशोकनगर येथील चौथ्या क्रॉसजवळ अनेकांच्या घरामध्ये ड्रेनेजचे पाणी तसेच साचून राहत आहे. त्यामुळे घरामध्ये राहणे मुश्कील झाले. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांनी त्यावेळी भेट दिली होती. समस्या सोडवू, असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर ते फिरकलेच नाहीत, असा आरोप जनतेतून होत आहे. अशोकनगर परिसरात ही घटना वारंवार घडत आहे. तेव्हा ड्रेनेजची पाईपलाईन स्वच्छ करावी. याचबरोबर चेंबरचीही दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

समस्या तातडीने सोडवावी : गजानन खाडीलकर

गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात ड्रेनेजची समस्या निर्माण झाली आहे. याबाबत महानगरपालिकेकडे अनेकवेळा तक्रारी केल्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे पावसाळ्यामध्ये आठवड्यातून एकदा ही समस्या भेडसावत आहे. तेव्हा तातडीने ड्रेनेजची समस्या सोडवावी, अशी मागणी  गजानन खाडीलकर यांनी केली.

तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा : पद्मा मेहता

अशोकनगर-चौथा क्रॉस परिसरात ही समस्या नेहमीचीच आहे. महापौर, उपमहापौरांनी भेट दिली. मात्र त्यानंतरही ही समस्या सोडविली नाही. त्यामुळे आम्ही कोणाकडे तक्रार करायची? असा प्रश्न पद्मा मेहता यांनी केला. समस्या न सोडविल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.