For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संगमेश्वरनगर येथे सायकल ट्रॅकवरील ड्रेनेज झाकण गायब

11:14 AM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
संगमेश्वरनगर येथे सायकल ट्रॅकवरील ड्रेनेज झाकण गायब
Advertisement

सोय असूनही सायकल ट्रॅक वापराविना

Advertisement

बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरामध्ये राबविण्यात आलेली विकासकामे अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे योजना केवळ नावालाच राबविल्याचा आरोप शहरावासियांतून करण्यात येत आहे. सायकल ट्रॅकसाठी रस्ता निर्माण करण्यात आला आहे. मात्र त्या रस्त्यावरील ड्रेनेजची झाकणे गायब झाल्याने सायकल ट्रॅक केवळ शोभेसाठीच असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.संगमेश्वरनगर ते एपीएमसीपर्यंतच्या रस्त्याचे दुतर्फा रुंदीकरण करून काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पादचाऱ्यांना फूटपाथ निर्माण करून रस्त्याचा विकास करण्यात आला आहे. रस्त्याच्या दुतर्फा सायकल ट्रॅकसाठी जागा सोडून ट्रॅक निर्माण करण्यात आला आहे. मात्र, ट्रॅकवर असलेली ड्रेनेजची झाकणे मोकळी असल्याने सायकल ट्रॅक बिनकामाचा ठरत आहे. या रस्त्यावरून शाळेला ये-जा करणाऱ्या सायकलस्वार विद्यार्थ्यांसह नागरिकांची संख्या मोठी आहे. मात्र, सायकल ट्रॅकवर ड्रेनज झाकण नसल्याने नागरिकांना सायकल ट्रॅकचा उपयोग करणे अशक्य ठरत आहे. त्यामुळे सायकल ट्रॅक असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सायकल ट्रॅकसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात असली तरी अर्धवट कामांमुळे सायकल ट्रॅकचा उपयोग होताना दिसत नाही. ड्रेनेजची झाकणे उघडी असल्याने ती धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याठिकाणी दगड ठेवून धोका दर्शविण्यात आला आहे. सदर उघड्या ड्रेनेजवर लोखंडी झाकण घालून धोका दूर करण्यात येत आहे, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.