ड्रेनेज चेंबर ब्लॉक होऊन सांडपाणी रस्त्यावर
09:09 AM Oct 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : सदाशिवनगर स्मशानभूमीच्या मागच्या बाजूला असलेले ड्रेनेज चेंबर ब्लॉक होऊन रस्त्यावर पाणी येत आहे. या पाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून परिसरात अनारोग्य पसरले आहे. स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेला याबाबत कळविले तरी संबंधित विभागाने याची दखल घेतली नसल्याने नाराजी पसरली आहे. सध्या पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने ठिकठिकाणी पाणी साचले आहे. खड्यात साचलेल्या पाण्याचा अंदाज येत नाही. त्यातच बऱ्याच ठिकाणी चेंबर ब्लॉक होण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच गटारीही तुंबून वहात आहेत. साथीचे रोग वाढण्यापूर्वी महानगरपालिकेने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
Advertisement
Advertisement