For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सियाचीन ग्लेशियरनजीक रस्तेनिर्मिती करतोय ड्रॅगन

07:00 AM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
सियाचीन ग्लेशियरनजीक रस्तेनिर्मिती करतोय ड्रॅगन
Advertisement

उपग्रहीय छायाचित्रातून झाला खुलासा

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

चीन आता पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये सियाचीन ग्लेशियरनजीक रस्ता निर्माण करत आहे. यासंबंधीचा खुलासा उपग्रहीय छायाचित्राद्वारे झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा रस्ता काँक्रिटद्वारे तयार केला जात आहे. हा रस्ता अवैध स्वरुपात पाकिस्तानने कब्जा केलेल्या काश्मीरमध्ये निर्माण केला जात असल्याने भारताचा यावर आक्षेप आहे. पाकिस्तानच्या कब्जातील काश्मीरचा एक हिस्सा 1963 साली पाकिस्तानकडून चीनला देण्यात आला होता. या हिस्स्यातील शक्सगम खोऱ्या चीन हायवे जी-219 चा विस्तार करत आहे. हा भाग चीनच्या शिनजियांगला लागून आहे. सियाचिन ग्लेशियरच्या इंदिरा कोलपासून 50 किलोमीटर अंतरावर उत्तर दिशेने हा भाग आहे. समोर आलेले उपग्रहीय छायाचित्र हे युरोपीय अंतराळ संस्थेने टिपले आहे. मागील वर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीत हा रस्ता चीनकडून तयार करण्यात आल्याचे समजते. तर दुसरीकडे मार्चपासून आतापर्यंत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दोनवेळा सियाचीनचा दौरा करत भारतीय सज्जतेचे उदाहरण दाखवून दिले आहे. चीनकडून निर्माण करण्यात येणारा रस्ता पूर्णपणे अवैध आहे. भारताने कूटनीतिक मार्गाने याप्रकरणी विरोध नोंदवावा असे उद्गार भारतीय सैन्याच्या फायर अँड फ्यूरी कोरचे माजी कमांडर लेफ्टनंट जनरल राकेश शर्मा यांनी काढले आहेत. फायर अँड फ्यूरी कोरच कारगिल, सियाचीन ग्लेशियन आणि पूर्व लडाखमध्ये तैनात आहे. पीओकेमधील रस्ते निर्मितीला भारताने सातत्याने विरोध दर्शविला आहे. परंतु पाकिस्तानकडून या क्षेत्रांना चीनशी रस्त्याने जोडण्याचा प्रयत्न होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.