जि. पं., ता. पं. चे प्रारूप आरक्षण जाहीर
कर्नाटकातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायतींच्या प्रारूप तथा कच्च्या आरक्षणाची अधिसूचना शुक्रवारी जाहीर करण्यात आली. ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाकडून 9 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आलेल्या या अधिसूचनेमुळे बेळगाव जिह्यातील राजकीय हालचालींना वेग येणार आहे.
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव - निपाणी
कर्नाटक ग्राम स्वराज आणि पंचायत राज अधिनियम, 1993 मधील तरतुदींनुसार जिल्हा पंचायत मतदारसंघांचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. यासंदर्भात शासनाने राजपत्राद्वारे प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यापूर्वी जारी करण्यात आलेल्या संबंधित अधिसूचना रद्द करून नव्याने आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. तब्बल पाच वर्षांपासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या जि.पं. आणि ता. पं. च्या इच्छुकांच्या हालचाली आता सुरू होणार आहेत.
19 ऑक्टोबरपर्यंत हरकतींची मुदत
प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप आरक्षणाबाबत नागरिकांना आक्षेप किंवा सूचना नोंदवायच्या असल्यास 19 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. संबंधित कागदपत्रांसह हे अर्ज पोस्टाद्वारे अथवा प्रत्यक्ष उपस्थित राहून शासनाकडे सादर करावे लागणार आहेत. आक्षेप व सूचना सादर करण्यासाठी शासनाचे कार्यदर्शी (पंचायत राज), ग्रामीण विकास व पंचायत राज विभाग, तिसरा मजला, तिसरा टप्पा, बहुमजली इमारत, डॉ. बी. आर. आंबेडकर मार्ग, बेंगळूर 560001 हा पत्ता निश्चित करण्यात आला आहे.
मुदतीनंतरच्या अर्जांचा विचार नाही
जिल्हा पंचायतीसोबत तालुका पंचायतीच्या आरक्षणाचीही घोषणा करण्यात आली आहे. यालाही आक्षेप नोंदवण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा विचार केला जाणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. तसेच पोस्टाच्या विलंबामुळे अर्ज वेळेत पोहोचला नाही, तर त्याची जबाबदारी शासन किंवा संबंधित विभाग स्वीकारणार नसल्याचेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना प्राप्त झाल्यानंतर पुढील प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे लक्ष आता आपल्या मतदारसंघातील आरक्षणाच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे. आरक्षणामुळे अनेक इच्छुकांच्या राजकीय गणितांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
बेळगाव तालुका पंचायत आरक्षण
होनगा अनुसूचित जमाती महिला
काकती मागास प्रवर्ग अ महिला
केदनूर सामान्य महिला
अगसगा सामान्य
कडोली सामान्य महिला
हुदली अनुसूचित जमाती महिला
अष्टे अनुसूचित जमाती
मुचंडी सामान्य
कंग्राळी बीके. अनुसूचित जाती महिला
उचगाव सामान्य
आंबेवाडी मागास प्रवर्ग अ महिला
तुरमुरी मागास प्रवर्ग ब महिला
बेळगुंदी मागास प्रवर्ग अ
बिजगर्णी सामान्य
येळ्ळूर मागास प्रवर्ग ब
किणये सामान्य
संतिबस्तवाड अनुसूचित जमाती
देसूर सामान्य महिला
धामणे एस. सामान्य
के. के. कोप्प सामान्य महिला
बस्तवाड सामान्य
हलगा सामान्य
नवे वंटमुरी अनुसूचित जमाती महिला
अंकलगी सामान्य महिला
भेंडिगेरी मागास प्रवर्ग अ
तारीहाळ सामान्य महिला
मुतगा मागास प्रवर्ग अ महिला
सांबरा मागास प्रवर्ग अ
बाळेकुंद्री बीके. अनुसूचित जाती
मारीहाळ मागास प्रवर्ग अ महिला
सुळेभावी सामान्य महिला
तुम्मरगुद्दी सामान्य
खानापूर तालुका पंचायतआरक्षण
कणकुंबी मागास अ वर्ग महिला
जांबोटी सामान्य
नेरसा सामान्य महिला
निट्टूर मागास ब वर्ग महिला
हलकर्णी सामान्य
गर्लगुंजी मागास अ वर्ग
देवलत्ती सामान्य
पारिश्वाड सामान्य
हिरेमन्नोळी सामान्य महिला
इटगी सामान्य
गंदीगवाड अनुसूचित जाती एससी महिला
बिडी सामान्य महिला
केरवाड सामान्य
कक्केरी अनुसूचित जाती महिला
हालशी सामान्य महिला,
नंदगड अनुसूचित जाती
हेब्बाळ मागास अ वर्ग महिला
गुंजी मागास अ वर्ग,
लोंढा मागास अ वर्ग महिला
गोधोळी मागास अ वर्ग
बेळगाव जिल्हा पंचायत आरक्षण
मतदारसंघ आरक्षण
काकती अनुसूचित जमाती (महिला)
कडोली सामान्य (महिला)
हुदली सामान्य
उचगाव मागास प्रवर्ग ब
बेळगुंदी सामान्य (महिला)
येळ्ळूर मागास प्रवर्ग अ (महिला)
हलगा सामान्य
अंकलगी सामान्य
सांब्रा मागासवर्ग अ
सुळेभावी सामान्य
जांबोटी सामान्य
गर्लगुंजी सामान्य (महिला)
पारिश्वाड अनुसूचित जाती (महिला)
कक्केरी अनुसूचित जमाती (महिला)
नंदगड मागास प्रवर्ग अ (महिला)
लोंढा सामान्य (महिला)
दड्डी सामान्य
पाच्छापूर मागास प्रवर्ग अ (महिला)
हिडकल सामान्य (महिला)
काद्रोळी मागास प्रवर्ग ब
अनंतपूर सामान्य (महिला)
गुंडेवाडी सामान्य
मदभावी सामान्य
अथणी ग्रामीण सामान्य (महिला)
दरुर (शेगुणशी) अनुसूचित जाती (महिला)
सत्ती मागास प्रवर्ग अ
कोकटनूर अनुसूचित जाती
ऐगळी सामान्य (महिला)
तेलसंग सामान्य
वोळे सामान्य
मंगसुळी सामान्य (महिला)
उगार बुद्रुक मागास प्रवर्ग अ
नेसरगी सामान्य
नागनूर अनुसूचित जमाती (महिला)
संपगाव सामान्य महिला
संगोळ्ळी सामान्य महिला
बेळवडी सामान्य महिला
दोडवाड मागास प्रवर्ग अ (महिला)
अंबडगट्टी अनुसूचित जमाती
खोदानपूर मागास प्रवर्ग अ
हिरेकोडी मागास प्रवर्ग अ (महिला)
मांजरी सामान्य (महिला)
केरूर अनुसूचित जाती (महिला)
खडकलाट सामान्य
पट्टणकुडी मागास प्रवर्ग अ
करोशी सामान्य (महिला)
नागरमुन्नोळी सामान्य (महिला)
कारदगा सामान्य
कोगनोळी सामान्य
बेडकिहाळ मागास प्रवर्ग अ (महिला)
सौंदलगा मागास प्रवर्ग अ (महिला)
अक्कोळ अनुसूचित जाती
सुलदाळ सामान्य
तवग अनुसूचित जमाती (महिला)
मक्कळगेरी सामान्य
ममदापूर मागास प्रवर्ग अ
कौजलगी अनुसूचित जाती (महिला)
मेळवंकी मागास प्रवर्ग अ
शिंधीकुरबेट सामान्य (महिला)
तुक्कानट्टी मागास प्रवर्ग ब (महिला)
हळ्ळूर मागास प्रवर्ग अ (महिला)
कुलगोड सामान्य
यादवाड अनुसूचित जाती
कणगला सामान्य
अम्मणगी सामान्य
एलिमुन्नोळी मागास प्रवर्ग अ
बेल्लद बागेवाडी अनुसूचित जाती (महिला)
घोडगेरी मागासवर्ग अ (महिला)
हेब्बाळ सामान्य (महिला)
हत्तरगी अनुसूचित जमाती
कुडची ग्रामीण मागास प्रवर्ग अ
अलखनूर मागास प्रवर्ग अ (महिला)
इटनाळ सामान्य
मेखळी सामान्य (महिला)
रायबाग ग्रामीणअनुसूचित जाती (महिला)
नसलापूर सामान्य (महिला)
हुलकुंद सामान्य (महिला)
बटकुर्की अनुसूचित जाती
कटकोळ मागास प्रवर्ग ब (महिला)
गोडची मागास प्रवर्ग अ
हलगत्ती सामान्य (महिला)
सुरेबान सामान्य
उगरगोळ सामान्य प्रवर्ग ब (महिला)
हुली मागास प्रवर्ग अ
शिंधोगी मागास प्रवर्ग अ (महिला)
करीकट्टी सामान्य
होसूर अनुसूचित जाती
मुरगोड सामान्य
यरझर्वी अनुसूचित जमाती
सत्तीगीरी सामान्य
