‘व्हिजन इंडियॉ2047’ साठी मसुदा तयार
निती अयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांचे प्रतिपादन : अर्थव्यवस्थेला अधिकची बळकटी देण्यासाठी योजनेची आखणी
नवी दिल्ली :
वर्ष 2047 पर्यंत भारताला सुमारे 3,000 अब्ज डॉलर क्षमतेची अर्थव्यवस्था विकसित करण्यात येणार असून याकरीता सरकार ‘व्हिजन इंडिया @ 2047’ या अंतर्गत दस्तऐवजाचा मसुदा 2047 करण्यात येणार असल्याची माहिती निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी बुधवारी सांगितले आहे.
‘व्हिजन इंडियॉ 2047’ दस्तऐवजाचा मसुदा 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनण्यासाठी आवश्यक असलेल्या संस्थात्मक आणि संरचनात्मक बदल आणि सुधारणांची रूपरेषा दर्शवणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले आहे. उद्योग संस्था एफआयसीसीआयच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना सुब्रमण्यम म्हणाले, ‘भारताला विकसित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी एक ‘व्हिजन प्लॅन’ तयार केला जात आहे. हा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जानेवारी 2024 मध्ये हा दस्तऐवज सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
निती अयोगाला 2023 मध्ये ‘व्हिजन इंडिया @ 2047’ च्या उद्दिष्टासाठी 10 प्रादेशिक थीमॅटिक पध्दती एकत्र करून एक संयुक्त व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचे काम सोपवण्यात आले होते. सरकार कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणांचा प्रवेश दर 27 वरून वाढवू इच्छित आहे. यामुळे महाविद्यालयात जाणाऱ्यांची संख्या चार कोटींवरून आठ-नऊ कोटी होईल. त्यासाठी कित्येक नवीन विद्यापीठांची आवश्यकता असेल असे सीईओंनी स्पष्ट केले.
सुब्रमण्यम यांनी अधोरेखित केले की राज्यांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे आणि त्यामुळे नवीन विद्यापीठे उघडण्यासाठी निधी खासगी क्षेत्रातून आणावा लागेल. ते म्हणाले की, बोस्टन आणि सॅन फ्रान्सिस्कोसारखी शहरे निर्माण करण्याची गरज आहे जिथे संशोधन आणि विकास आणि नाविन्यपूर्ण गोष्टी करता येतील.
भारतातील जवळपास निम्म्या लोकसंख्येचे सरासरी वय 29 वर्षांपेक्षा कमी असल्याचे लक्षात घेऊन, भारताच्या लोकसंख्येच्या संभाव्यतेचा फायदा घेण्यासाठी आमच्याकडे 25 वर्षे आहेत असे सुब्रमण्यम यांनी नमूद केले.
सर्वात मोठा कामगार पुरवठादार
भारत हा जगातील सर्वात मोठा कामगार पुरवठादार बनणार आहे कारण दरवर्षी 13 लाख भारतीय विद्यार्थी त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी भारताबाहेर जातात. अधिकाधिक विद्यार्थ्यांना भारतात आकर्षित करण्यासाठी पावले उचलली जावीत यावर त्यांनी भर दिला आहे.