कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

१४ जुलैला मतदारसंघ प्रारूपरचना

01:13 PM Jun 14, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

सांगली :

Advertisement

जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. प्रभाग रचना करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या ६८ असलेली गटांची संख्या आता ६१ झाली आहे. खानापूर मतदारसंघात एक गट आणि दोन गणांची नव्याने स्थापना करण्यात आली आहे. दि. १४ जुलैपर्यंत प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द होणार आहेत.

Advertisement

ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी प्रभाग रचनेचे आदेश दिले. सन २०१७ मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक झाली होती. त्यावेळी झेडपीचे ६० गट आणि पंचायत समितीचे १२० गण होते. जिल्हा परिषदेच्या सभागृहाची मुदत २० मार्च २०२२ रोजी संपली. महाविकास आघाडीच्या काळात नव्याने प्रभाग रचना करण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषदेचे ६८ आणि पंचायत समित्यांचे १३६ गणांची रचना केली. त्यानुसार आरक्षणाची सोडतही काढण्यात आली. मात्र ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. झालेल्या आरक्षण सोडतीला स्थगिती देण्यात आली होती. परिणामी तीन वर्षे निवडणूक झाली नाही. आता नव्या आदेशानुसार ६८ गटांची संख्या ६१ करण्यात आली आहे. खानापूर मतदारसंघात यापूर्वी नागेवाडी, लेंगरे आणि भाळवणी असे तीन गट होते. त्यामुळे नव्या रचनेनुसार ६१ गट आणि १२२ गणांत निवडणूक होणार आहे. प्रभाग रचना करताना २०१७ मधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रभाग रचना विचारात घेऊन कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रचना करताना शक्यतो ग्रामपंचायतीचे विभाजन होणार नाही, याचीही दक्षता घेण्यास सांगितले आहे. गटांची आणि गणांची प्रारूप प्रभाग रचना १४ जुलैपर्यंत प्रसिध्द करण्यास मुदत देण्यात आली आहे. प्रसिद्ध केलेल्या हरकतीवर जिल्हाधिकारी यांच्याकडे सूचना सादर करण्यासाठी २१ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. प्राप्त हरकतीच्या आधारे जिल्हाधिकारी आपला अभिप्रायासह प्रस्ताव २८ पर्यंत विभागीय आयुक्तांना देतील. ११ ऑगस्टपर्यंत आलेल्या सूचनांवर आणि हरकतींवर विभागीय आयुक्त सुनावणी घेऊन निर्णय घेतील. १८ ऑगस्टपर्यंत अंतिम प्रभाग रचनेस मान्यतेसाठी जिल्हाधिकारी प्रस्ताव सादर करतील.

▶ प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे : १४ जुलै

▶ जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती सादर करणे २१ जुलै

▶ हरकतीवर विभागीय आयुक्त यांना प्रस्ताव सादर करणे : २८ जुलै

▶ हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन निर्णय देणे ११ ऑगस्ट

▶ अंतिम प्रभाग रचना प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे सादर करणे : १८ ऑगस्ट

महापालिकेच्या प्रभाग रचनेस अंतिम प्रसिद्धी देण्यासाठी दि. २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अंतिम प्रभाग रचनेस दि. १८ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे नगरपरिषद, नगरपंचायत आणि महापालिकेच्या अगोदर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील की काय, अशी शंका व्यक्त होत आहे. गट आणि गणांच्या प्रभाग रचनेचे आदेश दिल्यामुळे ग्रामीण भागात राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article