डॉ. किरण ठाकुर यांची आयएनएसच्या सदस्यपदी निवड
प्रतिनिधी/ बेळगाव
इंडियन न्यूज पेपर सोसायटी म्हणजेच आयएनएस या देशातील वृत्तपत्रे नियतकालिकांच्या प्रकाशकांच्या सर्वोच्च संस्थेचे अध्यक्ष म्हणून केरळमधील ‘मातृभूमी’ समुहाचे व्यवस्थापकीय संचालक एम. व्ही. श्रेयांस कुमार यांची निवड झाली आहे. बेळगाव ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांची आयएनएसच्या सदस्यपदी निवड झाली आहे. सोसायटीची 85 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. त्यामध्ये 2024-25 या वर्षासाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
सोसायटीचे डेप्युटी प्रेसिडेंट म्हणून सन्मार्ग’ विवेक गुप्ता व व्हाईस प्रेसेडेंट म्हणून ‘लोकमत’चे करण राजेंद्र दर्डा यांची निवड झाली. ‘अमर उजाला’चे तन्मय माहेश्वरी यांची मानद खजिनदार म्हणून व मेरी पॉल यांची सोसायटीच्या जनरल सेक्रेटरी म्हणून निवड करण्यात आली.
आयएनएसचे अन्य सदस्य पुढीलप्रमाणे-
विलास मराठे (दैनिक हिंदुस्थान), एस. बालसुब्रमण्यम् आदित्यन (दैनिक थंती), गिरीश अग्रवाल (भास्कर), समहित बाल (प्रगतीवादी), योगेश प्रतापसिंह जाधव (पुढारी), प्रतापराव पवार (सकाळ), समुद्र भट्टाचार्य (हिंदुस्थान टाईम्स), श्रीमान होर्मुसजी एन. कामा (बॉम्बे न्यूज), गौरव चोप्रा (फिल्मी दुनिया), विजयकुमार चोप्रा (पंजाब केसरी), डॉ. विजय जवाहरलाल दर्डा (लोकमत), जगजितसिंग दर्दी (दैनिक चडदी कला), विवेक गोयंकार (द इंडियन एक्स्प्रेस), महेंद्र मोहन गुप्ता (जागरण), प्रदीप गुप्ता (डेटा क्वेस्ट), संजय गुप्ता (दैनिक जागरण), शैलेश गुप्ता (मिड डे), शिवेंद्र गुप्ता (बिझनेस स्टँडर्ड), श्रीमती सरविंद कौर (अजित), डॉ. आर. लक्ष्मीपती (दिन मलार), हर्षा मॅथ्यू (वनिथा), अनंतनाथ (गृहशोभिका, मराठी), पी. व्ही. निधीश (बालभूमी), राहुल राजखेवा (द सेंटीनल), आरएमआर रमेश (दिनकरण), अतिदेव सरकार (द टेलिग्राफ), पार्थ पी. सिन्हा (नवभारत टाईम्स), प्रबिन सोमेश्वर (द हिंदुस्थान टाईम्स), बिजू वर्गीस (मंगलम प्लस), आय. वेंकट (इ नाडू), कुंदन आर. व्यास (व्यापार जन्मभूमी), के. एन. तिलककुमार (डेक्कन हेराल्ड व प्रजावाणी), रविंद्र कुमार (द स्टेट्समन), किरण बी. वडोदरिया (वेस्टर्न टाईम्स), सोमेश शर्मा (साप्ताहिक राष्ट्रदुत), जयंत मामेन मॅथ्यू (मल्याळम मनोरमा), एल. आदिमुलम (हेल्थ अॅण्ड द अँटिसेप्टिक), मोहित जैन (इकॉनॉमिक्स टाईम्स), के. आर. पी. रेड्डी (साक्षी), राकेश शर्मा (आज समाज).