For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sejal Pawar Controversy "तर लोक देहदान करणं थांबवतील" डॉ. सेजल पवार यांना १५ दिवसांच्या सक्तीच्या रजेची शिक्षा

05:50 PM Jun 13, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
sejal pawar controversy  तर लोक देहदान करणं थांबवतील  डॉ  सेजल पवार यांना १५ दिवसांच्या सक्तीच्या रजेची शिक्षा
Advertisement

देहदात्याच्या खासगी अवयवावरुन विनोद करणं डॉ. सेजल पवार यांना चांगलंच महागात पडलं आहे. केईएम रुग्णालयाने पवार यांना १५ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.

Advertisement

डॉ. सेजल पवार यांच्या एका शोमधील वक्तव्यामुळे वाद निर्माण झाल्यानंतर काही दिवसांनी, ऑल इंडिया मेडिकल स्टुडंट्स असोसिएशनच्या एका सदस्याने या घटनेवर टीका केली आहे. त्यांच्या मते, यामुळे डॉक्टरांची प्रतिमा मलीन होते आणि त्यांच्या कामाचा अपमान होतो.

सक्तीच्या रजेची शिक्षा

Advertisement

एआयएमएसएच्या परदेशी वैद्यकीय विद्यार्थी शाखेचे महासचिव डॉ. कनिष्का कालरा यांनी डॉ. पवार यांच्या वक्तव्याच्या परिणामांबद्दल इशारा देताना म्हटले की, अशा घटनांमुळे लोक “वैद्यकीय शिक्षणासाठी” मृतदेह दान करण्यावर पुनर्विचार करतील.

या घटनेची सुरुवात एका कॉमेडी शोपासून झाली. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोमधील एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली, ज्यामध्ये डॉ. पवार 'पुरुषांच्या मृतदेहां'बद्दल टिप्पणी करताना आणि पुरुषांच्या गुप्तांगांच्या आकारांवर विनोद करताना दिसतात. या व्हायरल व्हिडिओमुळे समाजमाध्यमांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि मुंबईच्या किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालयाने, जिथे डॉ. पवार एमबीबीएसच्या विद्यार्थिनी आहेत, चौकशीचे आदेश देऊन त्यांना १५ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले.

डॉक्टरांची प्रतिमा डागाळते

डॉ. पवार यांचे वक्तव्य “अत्यंत चुकीचे” असल्याचे सांगत डॉ. कालरा म्हणाल्या, “जेव्हा समाजात अशी घटना घडते, तेव्हा रात्रंदिवस जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांच्या प्रतिमेलाही यामुळे डाग लागतो...”

त्या पुढे म्हणाल्या की, एखाद्या व्यक्तीचे कुटुंबीय त्यांच्या मृत्यूनंतर “वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासासाठी” मृतदेह दान करतात. “मला अजिबात वाटत नाही की त्या डॉक्टर आहेत. आकाराच्या आधारावर मृतदेहाला वस्तू मानणे योग्य वाटत नाही,” असे डॉ. कालरा यांनी पुढे म्हटले.

एआयएमएसएच्या सदस्या म्हणाल्या की, डॉ. पवार यांचे वक्तव्य ऐकल्यानंतर, “जे लोक आपले शरीर दान करण्यास तयार आहेत, ते भविष्यात असे करणार नाहीत.”

डॉ. कालरा म्हणाले की, या वक्तव्यांमुळे समाजात चुकीचा संदेश जातो. “तो मृतदेह कोणाच्यातरी आत्या, काका किंवा भावाचा असू शकतो,” असेही डॉ. कालरा म्हणाले.

Advertisement
Tags :

.