For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉ. रेड्डीज लॅबरोटरीचा समभाग वधारला

07:00 AM Jan 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
डॉ  रेड्डीज लॅबरोटरीचा समभाग वधारला
Advertisement

मुंबई : फार्मा क्षेत्रातील कंपनी डॉक्टर रेड्डीज लॅबरोटरीचा समभाग गुरुवारी शेअर बाजारामध्ये चार टक्के वाढलेला पाहायला मिळाला. गुरुवारी बीएसईवर कंपनीचा समभाग इंट्राडे दरम्यान 4.8 टक्के वाढत 1211 रुपयांवर पोहोचला होता. याच तुलनेमध्ये बीएसई सेन्सेक्स पाहता 0.89 टक्के वाढत 82,636 अंकांवर कार्यरत होता. कंपनीने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले असून निव्वळ नफा 14 टक्के घसरणीसह 1210 कोटी रुपयांवर पोहचला आहे. पण कंपनीच्या महसुलामध्ये मात्र वाढ झाली असून महसूल 8727 कोटी रुपयांचा नोंदवला गेला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.