For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉ. रजनीश गोयल राज्य सरकारचे नवे मुख्य सचिव

06:29 AM Nov 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
डॉ  रजनीश गोयल राज्य सरकारचे नवे मुख्य सचिव
Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

राज्य सरकारच्या मुख्य सचिव वंदीता शर्मा 30 नोव्हेंबर सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी डॉ. रजनीश गोयल यांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्य सरकारने मंगळवारी रात्री यासंबंधीचा अधिकृत आदेश जारी केला आहे. रजनीश गोयल हे 1986 च्या कर्नाटक केडरचे आयएएस अधिकारी आहेत. ते गृह खात्याचे अप्पर मुख्य सचिव म्हणून पदभार सांभाळत आहेत. 30 नोव्हेंबर रोजी वंदीता शर्मा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर रजनीश गोयल राज्य सरकारचे नवे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारतील. सेवाज्येष्ठतेच्या आधारे त्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असेल.

Advertisement
Advertisement
Tags :

.