डॉ. राधामोहनदास अगरवाल राज्य भाजपचे नवे प्रभारी
सहप्रभारीपदी सुधाकर रेड्डी यांची नेमणूक
प्रतिनिधी/ बेंगळूर
लोकसभा निवडणूक संपताच कर्नाटक भाजपमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. भाजप हायकमांडने शुक्रवारी अरुणसिंग यांना कर्नाटक राज्य भाजप प्रभारीपदावरून हटविले आहे. या जागी खासदार डॉ. राधामोहनदास अगरवाल यांची तर सहप्रभारीपदी सुधाकर रे•ाr यांची नेमणूक करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजप हायकमांडने कर्नाटकासाठी निवडणूक प्रभारी म्हणून डॉ. राधामोहनदास अगरवाल यांच्यावर जबाबदारी सोपविली होती. त्यांनी पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांना उत्तम मार्गदर्शन केले होते. राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेवर असून देखील राधामोहनदास अगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात भाजपला 17 जागा जिंकता आल्या आहेत. याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांची राज्य प्रभारीपदी नेमणूक केली आहे.
अगरवाल आणि सुधाकर रे•ाr यांचे भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी अभिनंदन केले आहे. पक्षासाठी या दोन्ही नेत्यांचे मार्गदर्शन आवश्यक आहे. त्यांचे मार्गदर्शन कर्नाटकात पक्षसंघटना, पोटनिवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लाभदायक ठरणार आहे, असा विश्वास विजयेंद्र यांनी व्यक्त केला.