डॉ. प्रभाकर कोरे यांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट
10:47 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशी चर्चा करताना डॉ. प्रभाकर कोरे.
Advertisement
बेळगाव : केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी बेंगळूर येथे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली. सदाशिवनगर येथील उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. रायबाग तालुक्यातील दिग्गेवाडी व चिकोडी तालुक्यातील इंगळी दरम्यान कृष्णा नदीवर ब्रिज कम बॅरेज बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. उर्वरित कामासाठी अनुदान मंजूर करावे. या बॅरेजवरील रस्त्याचे कामही त्वरित हाती घ्यावे, अशी मागणी प्रभाकर कोरे यांनी केली. लवकरात लवकर या मागणीची पूर्तता केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
Advertisement
Advertisement