For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉ. पूनम सावंत यांच्या पीएचडी संशोधनाला भारत सरकारचे पेटंट जाहीर

04:02 PM Apr 27, 2025 IST | अनुजा कुडतरकर
डॉ  पूनम सावंत यांच्या पीएचडी संशोधनाला भारत सरकारचे पेटंट जाहीर
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

कलंबिस्त येथील डॉ. पूनम गुंडू सावंत यांच्या डिवाइस फॉर प्रेडिक्टींग कस्टमर बिहेवियर फॉर पर्सनलाईज बँकिंग सर्विसेस या संगणक शास्त्रातील पीएचडी संशोधनाला भारत सरकारचे पेटंट जाहीर झाले आहे. यासाठी त्यांना डॉ. अभिजीत कैवाडे यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. पूनम सावंत या कलंबिस्त हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री गुंडू सावंत व प्राथमिक शिक्षिका वैशाली सावंत यांच्या कन्या आहेत. तसेच त्या कलंबिस्त हायस्कूल, आरपीडी जूनियर कॉलेज व एसपीके कॉलेज सावंतवाडीच्या माजी विद्यार्थिनी आहेत. यापूर्वी त्यांना संगणक क्षेत्रातील उपक्रमशील कार्याबद्दल आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले असून त्यांच्या नावावर वीस पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय शोधनिबंध आहेत. सध्या त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएचडी मार्गदर्शक आणि सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये स. प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे .

Advertisement
Advertisement
Tags :

.