महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

डॉ.निंबाळकर कारवार लोकसभेच्या रखवालदार

11:00 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

माजी मंत्री रमानाथ रै : पेंद्र सरकारवर दुजाभावाचा आरोप : निधीच्या बाबतीतही अन्याय

Advertisement

कारवार : कारवार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांना डॉक्टर, आमदार या नात्याने सेवा बजावल्याचा अनुभव आहे. त्या कारवार लोकसभा मतदारसंघाच्या रखवालदार म्हणून सेवा बजावतील. डॉ. निंबाळकर यांना निवडून आणा आणि त्यांना तुमची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्या, असे आवाहन काँग्रेसचे माजी मंत्री रमानाथ रै यांनी केले. रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, काँग्रेसच्या राजवटीत गोवा-मंगळूर दरम्यानच्या राष्ट्रीय हमरस्ता क्र. 64 च्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले होते. 10 वर्षे उलटून गेली तरी रस्त्याचे काम पूर्णत्वाला गेले नाही. ज्या वेळी देशवासियांसाठी आधार कार्ड आणण्याचा प्रस्ताव काँग्रेसने ठेवला त्यावेळी आधार कार्डला विरोध करणाऱ्या भाजपने आता अनेक बाबींसाठी आधार कार्ड सक्तीचे केले आहे. जीएसटीच्या बाबतीत कर्नाटक राज्य संपूर्ण देशात दुसऱ्या क्रमांकावर असले तरी जीएसटीमधील आमचा वाटा आम्हाला पेंद्र सरकारकडून दिला जात नाही, असा आरोप करून रै पुढे म्हणाले, नैसर्गिक आपत्ती निधीच्या बाबतीतही कर्नाटकवर अन्याय केला जात आहे.

Advertisement

निवडणूक बॉण्डच्या माध्यमातून अधिकृत भ्रष्टाचार

निवडणूक बॉण्डच्या माध्यमातून भाजपने अधिकृत भ्रष्टाचार केला आहे. काँग्रेसने बॉण्डला विरोध केला होता. ईडीचा धाक दाखवून भाजपने बॉण्डच्या माध्यमातून मोठी माया जमविली आहे, असा आरोप करून रै पुढे म्हणाले, राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी पक्षांतर बंदी कायदा आणला. तो कायदा दुर्बल करण्याचे काम भाजपने केले आहे. ऑपरेशन कमळसारखे उपक्रम राबवून भाजपने लोकशाहीला कलंक लावला आहे. सरकारे पाडण्यात आली. केंद्राचा गोव्याला एक न्याय तर कारवार जिल्ह्याला दुसराच. पंतप्रधान वाराणसीतून का निवडणूक लढवीत आहेत? असा प्रश्न उपस्थित करून त्याबद्दल आम्ही कधी प्रश्न केला आहे का? एकदा दोनदा खोटे बोलून राज्य करता येते. तथापि नेहमीच खोटे बोलून फसविता येत नाही.

गॅरंटी योजनांची खिल्ली

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने गॅरंटी योजनांची घोषणा केली, त्यावेळी भाजपवाल्यांनी योजनांची खिल्ली उडविली. तथापि, काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर योजनांची अंमलबजावणी करून आपण बोले तैसा चाले हे सिद्ध करून दाखविले. योजनांवर टीका करणाऱ्या भाजपला आता गॅरंटीचा आधार घ्यावा लागत आहे. आर्थिक तज्ञ असलेल्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी उत्तम राजवट केली. सोनिया गांधी यांना देशाचे पंतप्रधान होण्याची संधी चालून आली असता त्यांनी पंतप्रधानपदाचा त्याग करून जगासमोर आदर्श घालून दिला. देशाचा कोसळणारा आर्थिक डोलारा काँग्रेसने सावरला, असे पुढे रै यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article