Sangali News : डॉ. एम. आर. कुलकर्णी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन..
04:02 PM Apr 05, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
'कवडसे आठवणींचे' या लेख संग्रहाचा प्रकाशन सोहळा
मिरज : येथील ज्येष्ठ फिजिशियन डॉ. एम. आर. कुलकर्णी यांनी लिहिलेल्या 'कवडसे आठवणींचे' या लेख संग्रहाचा प्रकाशन सोहळा सांगलीतील ज्येष्ठ क्ष-किरण तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास नाटेकर यांच्या हस्ते, डॉ. दयानंद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आणि मासिक सारांशचे संपादक व्यंगचित्रकार अनिल दबडे व उपसंपादक डॉ. विजयकुमार माने यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
डॉक्टरांचे सदर लेख मासिक सारांशमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. श्रीधर कुलकर्णी यांच्या सुमधुर स्वरातील गणेश स्तवनाने झाली. सदर पुस्तकात वैद्यकीय, आध्यात्मिक तथा चित्रपट अशा विविध विषयांवरील लेख असल्याचे डॉ. नाटेकर यांनी सांगितले.
डॉ. दयानंद नाईक यांनी डॉ. एम. आर. कुलकर्णी यांची मुलाखत घेत या पुस्तक निर्मितीची प्रक्रिया रसिकांसमोर उलगडून दाखवली व डॉ. एम. आर. कुलकर्णी यांच्या स्मरणशक्तीचे विशेष कौतुक केले.
सूत्रसंचालन अनिल कुलकर्णी यांनी केले. साधना कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. रोहिणी कुलकर्णी, डॉ. प्रवीण कुलकर्णी, डॉ. कीर्ती कुलकर्णी, डॉ. अनिरुद्ध कुलकर्णी उपस्थित होते.