डॉ. किरण ठाकुर यांना ‘गुऊमाहात्म्य पुरस्कार’ प्रदान
डॉ. ठाकुर यांचे कार्य प्रेरणादायी : शाहू महाराज छत्रपती
प्रतिनिधी / पुणे
इतिहास हा इतिहासच असतो. त्यात कधीही बदल करता येत नाही. म्हणूनच खरा इतिहास बाजूला सारून कुणीही इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नये, असे मत खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी रविवारी येथे व्यक्त केले. डॉ. किरण ठाकुर आणि पांडुरंग बलकवडे यांनी समाजाला आपापल्या कामातून योग्य दिशा देण्याचे काम केले, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. ‘श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट’तर्फे देण्यात येणारा मानाचा ‘गुऊमाहात्म्य पुरस्कार’ यंदा ‘तऊण भारत’चे समूह प्रमुख व सल्लागार संपादक आणि ‘लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे संस्थापक- अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर तसेच ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांना खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. श्री दत्त महाराजांची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह, महावस्त्र व 25 हजार ऊपये असे पुरस्काराचे स्वऊप आहे. एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, श्री शिवाजी मराठा सोसायटीचे सचिव अण्णा थोरात, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, ‘श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट’चे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, कार्यकारी विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, अॅड. रजनी उकरंडे, सुनील ऊकारी, अक्षय हलवाई, महेंद्र पिसाळ, अॅड. शिवराज कदम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. पराग काळकर, युवराज गाडवे आदी उपस्थित होते. यावेळी शाहू महाराज छत्रपती म्हणाले, आपला इतिहास अजूनही सर्वांपर्यंत योग्य तऱ्हेने पोहोचलेला नाहा लोकांपर्यंत खरा इतिहास पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. मात्र, इतिहासात बदल कसा करता येईल, याकडे काही जण लक्ष देत आहेत. परंतु, इतिहास हा अखेर इतिहास असतो. त्यामुळे कुणीही तो बदलण्याचा प्रयत्न करू नये. महाराष्ट्राला संत परंपरेची मोठी पार्श्वभूमी लाभली. असा देदीप्यमान वारसा लाभलेले दुसरे राज्य नसावे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यातून त्यांनी जनतेला अन्यायातून मुक्त केले. तेच कार्य संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी यांनी पुढे नेले. अखेर औरंगजेबाचाही अंत या मातीत झाला. महाराष्ट्राला लाभलेला इतिहास खूप मोठा आहे. हा इतिहास समजून घेऊन आणि शिवरायांचा विचार घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे, असे ते म्हणाले. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, आज जगभरात भयानक स्थिती आहे. एक प्रकारची अस्वस्थता सर्वत्र दिसत आहे. अशा वेळी संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे. म्हणूनच ज्ञानोबा, तुकोबांनी सांगितलेला जीवनाचा सिद्धांत आपल्याला जगासमोर आणण्याची गरज आहे. पांडुरंग बलकवडे म्हणाले, साधू-संतांनी आपल्या संस्कृतीचे रक्षण केले. संस्कृतीतून त्यांनी समाज टिकवून ठेवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करीत आदर्श आणि लोककल्याणकारी राज्य निर्माण केले. त्याचबरोबर महाराजांनी आपल्या संस्कृतीला दास्यातून मुक्त केले, भयातून मुक्त केले. म्हणूनच शिवरायांकडून मिळणारी प्रेरणा खूप मोठी आहे..
डॉ. ठाकुर यांचे कार्य प्रेरणादायी : शाहू महाराज छत्रपती
शाहू महाराज छत्रपती यांनी आपल्या भाषणात डॉ. किरण ठाकुर व पांडुरंग बलकवडे यांच्या कार्याचा गौरव केला. समाजाला दिशा देण्याचे काम डॉ. ठाकुर यांनी केले आहे. त्यामुळे गुरुमाहात्म्य पुरस्कारासाठी त्यांची झालेली निवड सार्थच असून, त्यांच्या कायून भावी पिढ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
लोकांच्या विकासाकरिता कटिबद्ध : डॉ. किरण ठाकुर
डॉ. किरण ठाकुर म्हणाले, या पुरस्कारासाठी माझी निवड झाली, याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. पुण्याचे जे प्रेम लाभले त्याचा मला सार्थ आनंद होतो. भारतीय संस्कृतीत गुरुला अतिशय महत्त्व आहे. गुरु आयुष्याला दिशा देतात. म्हणूनच गुरुसात परब्रम्ह, अशा शब्दांत आपली संस्कृती गुऊची महती सांगते. मला आई-वडिलांकडून राजकारण आणि समाजकारणाचे धडे मिळाले. चलेजाव चळवळ, स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्र, सीमालढ्यात वडिलांनी सहभाग घेतला. ‘तऊण भारत’सारख्या लढाऊ वृत्तपत्राचे नेतृत्व त्यांनी केले. हा समृद्ध वारसा आणि उत्तरदायित्व मला मिळाले. आधुनिक क्रांतीचा वसा घेतानाच ‘तऊण भारत’ने आपली निर्भिड वृत्ती जपली आहे. कुणाचाही मुलाहिजा न बाळगता स्वाभिमानाची लढाई आम्ही लढत असून, आमचे वृत्तपत्र कुणाचे मिंधे नाही. ‘लोकमान्य’च्या माध्यमातून आम्ही सहकारी चळवळीतही काम करत आहोत. संस्थेची आर्थिक प्रगती साधतानाच समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून लोकांच्या आर्थिक विकासाकरिता आम्ही कटिबद्ध असल्याचेही डॉ. ठाकुर यांनी सांगितले. सीमाभागात आणि गोव्यात मराठीची अवहेलना होत आहे. म्हणूनच मराठी संस्कृती जगविण्याचे काम आम्ही करत असल्याचे त्यांनी नमूद केले.