For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

100 Days : डॉ. कादंबरी बलकवडे यांचा सत्कार, 100 दिवस सुधारणा कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी

04:42 PM May 20, 2025 IST | Snehal Patil
100 days   डॉ  कादंबरी बलकवडे यांचा सत्कार  100 दिवस सुधारणा कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी
Advertisement

 योजनेअंतर्गत अधिकाऱ्यांना उत्कृष्ट कामागिरीसाठी गौरविण्यात आले आहे.

Advertisement

मुंबई : मुंबई येथे आज 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमातील सर्वोत्तम राज्यस्तरीय संस्था, मंडळे व शासकीय कंपन्यांचा सत्कार करण्यात आला. मागील काही दिवसांपासून राज्य शासनाचा हा स्तुत्य उपक्रम राज्या अंतर्गत विविध जिल्ह्यात, विभागात राबवला जात आहे. आजवर या योजनेअंतर्गत अनेक अधिकाऱ्यांना उत्कृष्ट कामागिरीसाठी गौरविण्यात आले आहे.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालय, मुंबई येथे आज 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमातील सर्वोत्तम राज्यस्तरीय महामंडळे, प्राधिकरणे, शासकीय/निमशासकीय संस्था, मंडळे व शासकीय कंपन्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेच्या संचालिका डॉ. कादंबरी बलकवडे यांनाही गौरविण्यात आले. संचालिका डॉ. बलकवडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

Advertisement

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (M.GENCO), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( PMRDA), महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (MEDA), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) या विभागातील अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, संबंधित अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

मंत्रालयातील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमात १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत या संस्थांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची प्रशंसा करण्यात आली. या संस्थांनी कार्यक्षमता, पारदर्शकता आणि जनहिताच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा गौरव करण्यात आला. डॉ. बलकवडे यांनी मेडाच्या माध्यमातून अक्षय ऊर्जा, ऊर्जा संवर्धन आणि टिकाऊ विकासाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मेडाने सौरऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्यासाठी अनेक नावीन्यपूर्ण प्रकल्प राबवले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संस्थांच्या कार्याची प्रशंसा केली आहे.

“हा सन्मान माझ्यासाठी आणि मेडाच्या संपूर्ण टीमसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. आम्ही अक्षय ऊर्जा आणि टिकाऊ विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत आणि पुढील काळातही आमचे कार्य अधिक प्रभावीपणे सुरू ठेवू.” - डॉ. कादंबरी बलकवडे

Advertisement
Tags :

.