For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशाच्या अन्नसुरक्षेसाठी डॉ.जगजीवनराम यांचे कार्य

03:03 PM Apr 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
देशाच्या अन्नसुरक्षेसाठी डॉ जगजीवनराम यांचे कार्य
Advertisement

डॉ. संजीव तळवार यांचे प्रतिपादन : हरितक्रांतीचे शिल्पकार डॉ. बाबू जगजीवनराम जयंती प्रशासनातर्फे साजरी

Advertisement

बेळगाव : इतिहास अनेक महान व्यक्तींना घडवतो, पण काळ काही मोजक्मया व्यक्तींनाच लक्षात ठेवतो. त्यामध्ये डॉ. बाबू जगजीवनराम यांचा समावेश होतो. समाजातील समतेचा पाया मजबूत करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. कामगारांचे हित हेच देशाचे हित जोपासत अन्नसुरक्षा म्हणजेच देशाची सुरक्षा असा संदेश देत त्यांनी अथक परिश्र्रम घेतले. हरितक्रांतीचे शिल्पकार म्हणून त्यांनी देशाला अन्नधान्याच्या बाबतीत सक्षम केले, असे प्रतिपादन डॉ. संजीव तळवार यांनी केले.

जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महापालिका, समाजकल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने संगमेश्वरनगर येथील डॉ. बाबू जगजीवनराम उद्यानात आयोजित जयंती उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. तळवार म्हणाले, लहानपणापासूनच जातीय व्यवस्थेचा विरोध करत समाजातील अन्यायकारक प्रथा दूर करण्यासाठी डॉ. बाबू जगजीवनराम यांनी प्रयत्न केले. उपपंतप्रधान पदावर असतानाही जातीनुसार शुल्क आकारण्याला विरोध करून गुणवत्तेच्या आधारावर संधी मिळावी, असा त्यांनी आग्रह धरला, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement

जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी, समस्या सांगणारे नव्हे तर त्यांचे निराकरण करणारेच खरे नेते असतात. कामगारांसाठी अनेक कायदे डॉ. बाबू जगजीवनराम यांनी लागू केल्याचे त्यांनी सांगितले. प्रांताधिकारी श्र्रवण नायक यांनी, प्रशासनाचा खरा उद्देश लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे हा असल्याचे सांगून डॉ. बाबू जगजीवनराम यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.

प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात डॉ. बाबू जगजीवनराम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस सुऊवात करण्यात आली. ही मिरवणूक विविध लोककला पथकांच्या सहभागासह संगमेश्वरनगरपर्यंत काढण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख आर. बी. बसर्गी, समाजकल्याण विभागाचे संयुक्त संचालक रामनगौड कन्नोळी, साहाय्यक संचालक बसवराज चन्नय्यनवर, कन्नड व संस्कृती खात्याच्या उपसंचालिका विद्यावती बजंत्री, रायप्पगोळ, महादेव बजंत्री, भीमराव पवार, मल्लेश चौगला, महादेव तळवार, भावकण्णा भंग्यागोळ, करेप्पा गुड्डेन्नवर, सिद्राय मेत्री यांच्यासह विविध विभाग अधिकाऱ्यांसह समाज बांधव उपस्थित होते.

प्रेरणादायी विचार

पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी, डॉ. बाबू जगजीवनराम यांचे विचार प्रत्येक तऊणासाठी प्रेरणादायी आहेत. समता आणि समभाव या मूल्यांवर आधारित जीवन जगणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.