For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांना किमान एक वर्ष मुदतवाढ द्या

05:10 PM May 28, 2026 IST | अनुजा कुडतरकर
डॉ  ज्ञानेश्वर ऐवळे यांना किमान एक वर्ष मुदतवाढ द्या
Advertisement

रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी मंगेश तळवणेकर यांची मागणी

Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे रविवारी ३१ मे रोजी निवृत्त होत आहे. ते निवृत्त झाल्यानंतर एक पद रिक्त होणार असून त्या जागेवर डॉ ज्ञानेश्वर यांना एक वर्षाचा कार्यकाळ वाढवून द्यावा. अशी मागणी विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे १९९६ पासून शासकीय सेवेत रुजू असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी सर्वाधिक उत्कृष्ट सेवा दिली आहे. सध्या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या सध्याच्या असलेल्या आरोग्य सुविधांमध्ये ते रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा आहेत. त्यांच्या नियोजनामुळेच जिल्ह्यात सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. सध्या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात भेडसावणाऱ्या समस्या आणि भरती न केलेली रिक्त या पार्श्वभूमीवर कोरोना काळात डॉ. उत्तम पाटील व डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्याप्रमाणे डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनाही किमान एक वर्षांचा कार्यकाळ वाढवून द्यावा. आणि रुग्णांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी मंगेश तळवणेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.