किणये भागात डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात
विविध भागातील कार्यकर्ते मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी
वार्ताहर/किणये
तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सोमवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावागावातील सार्वजनिक युवक मंडळे, ग्रामपंचायती व विविध संघ संस्थांच्यावतीने महामानव डॉ. आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी सकाळी बहुतांशी गावांमध्ये कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली. मिरवणुकीत तालुक्याच्या विविध भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.बहुतांश गावांमध्ये शांतीचे प्रतीक असणारे निळ्याचे रंगाचे वस्त्र कार्यकर्त्यांनी परिधान केले होते. तालुक्याच्या काही गावांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधण्यात आली आहेत. त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेबांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी गावांमध्ये सरबत तसेच गोड पदार्थाची वाटप केले.